13 zp school will closed soon in nagpur 
नागपूर

धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या आणखी १३ शाळा होणार बंद, विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन

नीलेश डोये

नागपूर : राज्य शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या आणखी १३ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १,५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ होती. २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद केल्या. आता आणखी कमी पटसंख्येच्या तसेच एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. जि.प.च्या शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व मध्यान्ह भोजन आदी सुविधा पुरविण्याता येते. मात्र, त्यानंतरही जि.प.च्या शाळांची पटसंख्या वाढत नसल्याचे दिसते. असलेली पटसंख्याही आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या. त्यामध्ये नागपूर जि.प.च्या १६ वर शाळांचा समावेश होता. आता नव्याने १६ शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला. उमरेड तालुक्यातील दोन शाळांचे अंतर एक किलोमीटरपेक्षा अधिक होते. तर कुही तालुक्यातील एक शाळा यापूर्वीच बंद केल्याने या तीन शाळा वगळून १३ शाळा समायोजित करण्यात येतील. 


या शाळांचे होणार समायोजन -

तालुका मूळ शाळा समायोजित करावयाच्या शाळेचे नाव
कामठी प्राथ.शाळा भूगाव क्र.२ प्राथ. शाळा भूगाव क्र. १ 
कामठी प्राथ. शाळा येरखेडा प्राथ. शाळा मरारटोली 
नागपूर प्राथ. शाळा वाडी क्र. २ प्राथ. शाळा वाडी क्र. १ 
काटोल प्राथ. शाळा कचारीसावंगा क्र.१ प्राथ. शाळा कचारी सावंगा (पुनर्वसन) 
काटोल प्राथ. शाळा पारडसिंगा प्राथ. शाळा वडविहिरा 
नरखेड प्राथ. शाळा बेलोना क्र.१ प्राथ. शाळा बेलोना क्र. २ 
नरखेड प्राथ. शाळा खैरगाव क्र.२ प्राथ. शाळा खैरगाव क्र. १ 
सावनेर प्राथ. शाळा वलनी क्र. १ प्राथ. शाळा वलनी क्र. २ 
सावनेर प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. १ प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. २ 
भिवापूर प्राथ. शाळा घाटउमरी (पुनवर्सन) प्राथ. शाळा गाळेघाट 
मौदा प्राथ. शाळा तारसा क्र. २ प्राथ. शाळा तारसा क्र. १ 
हिंगणा प्राथ. शाळा टाकळघाट क्र. २ प्राथ. शाळा टाकळघाट क्र. १ 
पारशिवनी प्राथ. शाळा कोयला खदान क्र. २ प्राथ. शाळा कोयला खदान क्र. १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT