142 additional teachers in Nagpur List announced by education secondary department sakal
नागपूर

Nagpur News : नागपुरात १४२ शिक्षक अतिरिक्त; माध्यमिक विभागाकडून यादी जाहीर

संचमान्यतेचा फटका ः पहिली ते पाचवीसाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे नोंदविण्यात आले.

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या शिक्षक संचमान्यतेमुळे हजारो शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली. त्यातच, विद्यार्थ्यांचे आधार नसल्याने कारण समोर करीत ठरविण्यात आलेल्या संचमान्यतेत नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील १४२ माध्यमिक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. तशी अधिकृत यादीच माध्यमिक विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नव्या संचमान्यतेनुसार, पहिली ते पाचवीसाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे नोंदविण्यात आले. सहावी ते आठवीसाठी ३५ तर नववी आणि दहावीसाठी तुकडीनिहाय शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निकषानुसार त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील मराठी, हिंदी आणि उर्दू शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होत आहे.

त्यातच विद्यार्थ्यांची आधार नोंदणीमध्ये ८० टक्केच विद्यार्थ्याची नोंदणी वैध ठरली. विशेष म्हणजे, त्यामुळे अनेक शाळांमध्ये पटसंख्या कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे इंग्रजी शाळा वाढल्याने पालकांचा त्याकडे वाढता कल यामुळे शाळांमधील पटसंख्येला फटका बसला. त्यातूनच जिल्हा आणि शहरातील शाळांमध्ये १४२ माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्याबाबत खासगी अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळांच्या व्यवस्थापनाने प्रस्ताव पाठविले आहे.

माध्यमिक विभाग घेणार सुनावणी

नागपूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांच्या व्यवस्थापनाने अतिरिक्त ठरविलेल्या १४२ शिक्षकांची यादी प्रकाशित केल्यावर त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी विभागाने पत्र काढले आहे. त्यासाठी गुरुवारी शिक्षकांना आक्षेप नोंदवायचे आहे.

शिक्षकांची अतिरिक्त होण्याची अनेक कारणे आहेत. जे शिक्षक अतिरिक्त झाले, त्याचे समायोजन करण्यासाठी विभाग कारवाई करेल.

- रवींद्र काटोलकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT