15 kg plastic was removed from the cow's stomach 
नागपूर

गाईच्या पोटातून १५ किलो प्लास्टिक काढले बाहेर

कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, नारळाची दोरी, तार, खिळे आढळले

सकाळ वृत्तसेवा

कोंढाळी : दुधाळा येथील रहिवासी मनोहर यांच्या पाळीव गाईच्या पोटातून कोंढाळी व लाडगाव येथील पशुवैदकीय अधिकाऱ्यांच्या चमूने १५ किलो प्लास्टिक कचरा बाहेर काढून तिला जीवनदान दिले. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, नारळाची दोरी, तार, खिळे आढळले.

दुधाळा येथील नारायण मनोहर जुराहे यांच्या पाळीव गाईला रस्त्यावर पडलेल्या खर्ऱ्याच्या प्लास्टिकच्या पन्न्या खायची सवय लागली. त्यात तिचे आरोग्य खराब झाले. डॉ. स्वप्नील रेवतकर यांना औषधोपचाराकरिता बोलावले. तेव्हा डॉ. रेवतकर यांना गाईच्या पोटात प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर लाडगाव येथील पशुवैद्यकीय डॉ. मयूर काटे, कोंढाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील रेवतकर, मदतनीस कंपाउंडर सुधीर कपशिकर, उमाजी भिंगारे यांनी गाईला सुंगीचे औषध देऊन २४ मार्चला तीन तास ऑपरेशन केले. तीन तास चाललेल्या या ऑपरेशननंतर गाईच्या पोटातील प्लास्टिकचा कचरा व इतर टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यात आले. गाईची प्रकृती सध्या चांगली आहे.

''शेतकऱ्यांनी आपली जनावरे प्लास्टिक खाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांनीसुद्धा प्लास्टिक कचरा रस्त्यावर टाकू नये. यात नाहक जनावरे प्लॅस्टिकला बळी पडतात व लाखो रुपयांची जनावरे दगावतात.''

- स्वप्नील रेवतकर, पशु वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT