16 patients of swine flu found in nagpur city sakal
नागपूर

कोरोनासह स्वाइन फ्लूचे संकट; २० बाधितांपैकी १६ जण नागपुरातील

नागपुरात कोरोनाची वाढती संख्या धोकादायक असतानाच स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात कोरोनाची वाढती संख्या धोकादायक असतानाच स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. पूर्व विदर्भात आढळलेल्या २० पैकी १६ स्वाइन फ्लूबाधित नागपुरातील आहेत. स्वाइन फ्लूबाधितांची संख्या वाढत असली तरी रोगप्रतिकारशक्तीच्या जोरावर १२ रुग्णांनी स्वाइन फ्लूवर मात केली. बुधवारी (ता. २७) दिवसभरात शहरातील विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूबाधितांची संख्या वाढलेली दिसली. नागपूर विभागात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या २० वर पोहोचली.

त्यातील तब्बल १६ रुग्ण नागपूरचे आहेत. नवीन रुग्णांमध्ये नागपुरातील ८० वर्षीय तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दोघांमध्ये स्वाइन फ्लूसदृश लक्षणे होती. त्यांची प्रकृती खालावत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. याशिवाय ६ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

स्वाइन फ्लूची लक्षणे
-घशात खवखव
-ताप येणे
-डोके दुखणे
-खोकला
-नाकातून पाणी गळणे

महापालिकेतर्फे विशेष हेल्पलाइन

जनतेने स्वाइन फ्लूला घाबरून जाऊ नये. स्वाइन फ्लूचा ताप साधारण तापासारखा असतो. केवळ काळजी घ्यावी. महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूवर खात्रीशील उपचार आहेत. महापालिकेद्वारे ९१७५४१४३५५ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून, सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात संपर्क साधता येईल.

- डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल अधिकारी, साथरोग विभाग, नागपूर महानगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT