building  
नागपूर

नागपूर शहरात तब्बल 173 जीर्ण इमारती! हजारावर नागरिकांचा जीव धोक्‍यात

राजेश प्रायकर

नागपूर : सगळीच शहरे लोकसंख्येच्या फुगवट्याने फुगत चालली आहेत. परिणामी जागांचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. लोक जागा मिळेल तिथे राहात आहेत. नागपूर शहरातही जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींची संख्या विपुल आहे. मात्र लोक त्या इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. जीव धोक्‍यात घालूनही तिथेच राहात आहेत. यासंदर्भात मनपा आयुक्‍तांनी नुकतीच बैठक घेऊन या इमारत मालकांना नोटीस बजावली, तरीही अजूनही या धोकादायक इमारती रिकाम्या झालेल्या नाहीत.

शहरातील 173 इमारती जीर्ण व धोकादायक असून यातील किमान हजार नागरिकांचा जीव धोक्‍यात आहे. महापालिकेकडून केवळ नोटीसची औपचारिकता पूर्ण केली जात असल्याने मुंबईतील मालाड येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. काल, मालाड येथे जीर्ण इमारत कोसळून दोघांचा मृत्यू तर 13 जण जखमी झाले.

मुंबईतील मालाड परिसरात झालेल्या अपघातानंतर शहरातील जीर्ण इमारतीतील नागरिकांचाही मुद्दा ऐरणीवर आला. शहरात विविध प्रवर्गाच्या इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण 173 इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले. राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करावयाच्या 97 इमारती आढळल्या आहेत. याशिवाय इमारत रिकामी करून दुरूस्ती करावयाच्या 25, इमारत रिकामी न करता दुरुस्ती करावयाच्या 35 इमारती आणि किरकोळ दुरुस्तीची गरज असलेल्या 16 इमारती आहेत. 97 इमारती तत्काळ पाडण्याची गरज आहे. यासाठी आयुक्तांनी नुकतीच बैठक घेऊन येथील नागरिकांना नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. नोटीसनंतर 15 दिवसांत घर खाली न केल्यास रहिवाशांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही दिला होता.

धोकादायक इमारतीमुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित इमारत किंवा घर मालकाची राहील, असेही त्यांनी बजावले होते. परंतु, आयुक्तांचे निर्देश केवळ औपचारिकता ठरल्याचे दिसून येत आहे. पुढे प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी तत्काळ पाडण्याची गरज असलेल्या 97 इमारतीतील नागरिकांचा जीव धोक्‍यात आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास टाळाटाळ करीत असलेल्या मालकावर 25 हजार रुपये किंवा संबंधित इमारत किंवा घराचे वार्षिक मालमत्ता कराची रक्कम, यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढ्या रकमेचा दंड ठोठावण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले होते. परंतु, याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे.

सविस्तर वाचा - ती शेतात रोवायला गेली अन्‌ महाविद्यालयातून आला फोन, मुलीबाबत विचारणा करताच आले भरून...

संपर्क साधण्याचे आवाहन
शहरातील एखाद्या इमारतीचा भाग मोडकळीस आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सूचना झोन कार्यालयाला द्यावी. मनपाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येईल. अपघात झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील 0712-2567029, 2567777, 7030972200 किंवा 101 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT