crime  
नागपूर

पोलिसाच्या घराला आग लावणारे CCTVतील ते दोघे कोण? कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न

अनिल कांबळे @anilkambleSakal

नागपूर ः पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घरावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारण्याच्‍या प्रयत्न केल्याच्या घटनेत अद्याप पोलिसांना कोणताही धागा गवसला नाही. त्यामुळे ही घटना घडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हे नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असून ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटरला तैनात आहेत. ते एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर पत्नी पूनम, मुलगा राघव (६) आणि केशव (३) यांच्यासह राहतात. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात दोन आरोपींनी राहुल यांच्या घरावर रॉकेल ओतले आणि आग लावली. त्यावेळी घरात राहुलची पत्नी पूनम आणि दोन्ही मुले होते.

घरात धूर दाटल्यामुळे पूनम या झोपेतून जागा झाल्या. त्यांनी समयसूचकता दाखवत दोन्ही मुलांना बेडरूममधून काढून किचनमध्ये आणले. मामाला फोन करून स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला. मामाने दार तोडून तिघांनाही बाहेर काढले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जप्त केले. दोन आरोपी घराच्या दरवाज्यातून रॉकेल ओतून आग लावताना दिसत आहेत. त्या दोघांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.

भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न

राहुलचे पहिल्या पत्नीसोबत नेहमी खटके उडत होते. वादावादीतून राहुलने पहिल्या पत्नीपासून २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्याही दिशेने पोलिस तपास करीत आहेत. तसेच राहुल भांडखोर स्वभावाचा असल्यामुळे त्याचा अनेकांशी वाद झाला आहे. त्यामुळे कुणी भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न केला का? याचाही तपास पोलिस करीत आहेत. पूनम यांनी ३-४ संशयितांची नावे सांगितली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूककोंडीचा कहर! सलग तिसऱ्या दिवशी १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Ladki Bahin Yojana October Installment : लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा? समोर आली महत्त्वाची अपडेट, सरकारकडून अधिकृत घोषणा कधी?

अवघ्या २ कोटींचं बजेट, जगभरात ४५० कोटींची कमाई; 'हनुमान अंश' आता ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमध्ये दाखल

Mumbai Local: दिवाळीत मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा अडथळा! लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीलाच ब्लॉक; पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT