2 smugglers nabbed at nagpur airport 200 gram gold bars worth Rs 38 lakh seized Sakal
नागपूर

Nagpur Crime : नागपूर विमानतळावर दोन तस्करांना पकडले; ३८ लाख रुपयांच्या २०० ग्रॅम सोन्याचे बार जप्त

मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव हे दोघे एअर अरेबिया विमानाने शारजाहून नागपूर येथील विमानतळावर उतरले.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम्स युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजेंस युनिटच्या (एआययू) पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी पहाटे सोन्याची तस्करी करणाऱ्या मुंबई येथील मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३८ लाख रुपयांच्या २०० ग्रॅम सोन्याचे बार व इतर वस्तू जप्त केल्या.

मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव हे दोघे एअर अरेबिया विमानाने शारजाहून नागपूर येथील विमानतळावर उतरले. ते सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोघेही विमानतळावर उतरताच त्यांना ताब्यात घेत तपासणी केली.

दरम्यान, दोघांकडून प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे बार सापडले. तसेच २० नग आय फोन १५ प्रो मॅक्स जप्त केले आहे. त्याची किमत १८ लाख १६ हजार ९३० रुपये आहे. तर आठ लॅपटॉपही आढळले. त्याचे मूल्य दोन लाख ५९ हजार रुपये आहे.

तर एक आयपॅड एअर जप्त केले. त्याची किंमत ४१ हजार आहे. १४ हजार ४०० नग विदेशी सिगारेट स्टिक्स मिळाले असून त्याची किंमत जप्त केले. १ लाख ९८ हजार रुपये त्याची किंमत आहे. या मुद्देमालाची किंमत ३७ लाख ८१ हजार आहे. या दोघांना सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्यांचा तपास करण्यात येत आहे. ही कारवाई

एआययूचे सहाय्यक आयुक्त अंजुम तडवी आणि एसीयूचे सहाय्यक आयुक्त व्ही. लक्ष्मीनारायण, सहाय्यक आयुक्त अलेक्झांडर लाक्रा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत सीमा शुल्क अधीक्षक मनीष पंढरपूरकर, राजेश खापरे, प्रकाश कापसे, सीमा शुल्क निरीक्षक विशाल भोपटे, शुभम कोरी, योगिता मुलाणी, आदित्य बैरवा, कृष्णकांत ढाकर आणि प्रियांका मीना पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT