Amravati Crime sakal
नागपूर

Amravati Crime : शहरात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळल्या

शहरात मोठ्या प्रमाणावर पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी शहरातील खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात मोठ्या प्रमाणावर पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी शहरातील खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सराफा बाजार परिसरात सुवर्णकारांची इतर व्यापाऱ्यांची सोने खरेदी विक्रीची दुकाने आहेत. बहुतांश व्यापाऱ्यांची येथील बडोदा बॕंक शाखेमध्ये खाती असल्याने दररोज लाखो रुपयांची उलाढाल केल्या जाते. १६ एप्रिल २०२४ रोजी याच भागातील दोन सुवर्णकारासह अन्य एक व्यापारी अशा तिघांनी टप्प्याटप्प्याने २५ लाख रुपये, २५ हजार रुपये तर तिसऱ्या व्यापाऱ्याने ५ हजार रुपये अशा पद्धतीने नोटांचा भरणा खात्यात केला.

ज्यावेळी बँकेच्या रोखपालने संपूर्ण नोटा आणि दिवसभराचा व्यवहार तपासला त्यावेळी त्यामध्ये पाचशे रुपयांच्या एकूण २० नोटा म्हणजेच एकूण दहा हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याची बाब उघडकीस आली.

ज्या व्यापाऱ्याने २५ लाखाचा भरणा केला होता. त्याच्या नोटांच्या बंडाला मध्ये १४, ५०० रुपयाच्या नकली नोटा आढळल्या. तर २५ हजाराचा भरणा करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या नोटांचे बंडलात तीन नकली नोटा तर पाच हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे बंडलमध्ये पाचशे रुपयांच्या काही नकली नोटा अशा एकूण वीस नकली नोटा आढळल्याची बाब उघडकीस आली. बँक प्रशासनासही व्यवस्थापक शशिकांत वारके यांनी खोलापुरी गेट पोलिस स्टेशन मध्ये शुक्रवार ता. ३ मे रोजी तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT