20 thousand health workers will get vaccine in first round in Nagpur  
नागपूर

नागपुरात पहिल्या टप्प्यात तब्बल २० हजार आरोग्य सेवकांचे होणार लसीकरण; महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची माहिती 

राजेश प्रायकर

नागपूर ः कोरोना लसीकरणासंदर्भात महापालिका तयारी करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लस येणार आहे. यापैकी नेमकी कोणती लस येईल, हे स्पष्ट नाही. मात्र, शहरात तीन टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. अंदाजे २० हजार आरोग्य सेवकांना ही लस दिली जाईल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

महापालिकेत मंगळवारी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. लसीकरणासाठी शहरातील सर्वच शासकीय व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. परंतु अद्यापही आवश्यक तसा प्रतिसाद नसल्याची खंत व्यक्त करीत आयुक्तांनी त्यांना लसही मिळणार नाही, असे सांगितले. जेवढ्या आरोग्य सेवकांची नोंदणी होईल, तेवढ्याच लस मिळणार आहे. त्यामुळे नोंदणी न करणाऱ्यांना लस मिळणार नाही. 

लसीकरण तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना तर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या काळात आघाडीवर राहून कामे करणारे पोलिस, विविध विभागातील कर्मचाऱ्या लस देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक, त्यानंतर विविध आजार असलेल्या नागरिकांना तर शेवटी इतर नागरिकांना लस देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लसीच्या प्रकारावरच ठेवण्याची व्यवस्था

लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. शहरात कुठल्या प्रकारची लस येणार हे स्पष्‍ट नाही. लस शहरात पोहोचल्यानंतरच कुठे आणि किती तापमानात ठेवायचे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर सरकारकडे तशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT