industry
industry e sakal
नागपूर

२०० उद्योगांना घरघर, ७००० कामगार होणार बेरोजगार

राजेश रामपूरकर

नागपूर : मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना दिली जाणारी सवलत राज्याच्या ऊर्जा विभागाकडून गेल्या चार महिन्यापासून बंद केली आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (minister Nitin Raut) यांनी ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक स्टील, प्लॅस्टिक आणि फेरो अलाईड उद्योगांचे विजेचे बिल वाढले आहे. वाढलेल्या बिलामुळे आर्थिक गणित विस्कळित झाले आहे. यात काम करणाऱ्या सात ते आठ हजार लोकांच्या रोजगारावर संक्रांत (Unemployment issue nagpur) येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना पाच वर्षांसाठी असल्याने ती २०२५ मध्ये संपणार आहे. सध्याच्या अर्थसंकल्पात महाआघाडी सरकारने १२०० कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे. या योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांचा विकास होत आहे. नवीन उद्योग येत आहेत. असे असताना योजनेतील सवलत २०२१ मध्ये थांबविण्यात आली आहे. डॉ. नितीन राऊत यांची शहरातील उद्योजकांनी भेट घेतली. वीज सवलतीबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यांनी ही योजना बंद झालेली नाही. ती लवकरच लागू केली जाणार असल्याचे सांगितले. ऊर्जा विभागाच्या सचिवांसह उद्योजकांसोबतही बैठक झाली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून सवलत बंद असून याचा उद्योगांवर परिणाम होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

मराठवाडा-विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी जाहीर झालेली ही योजना २०२५ पर्यंत लागू आहे. ती सवलत बंद करण्याची गरज नव्हती. योजनेचा मराठवाडा - विदर्भातील जवळपास सात हजार उद्योगांना थेट फायदा होत होता. जवळपास ३० ते ३५ कोटी रुपयांची सवलत त्यातून मिळत होती. मात्र, आता सवलत बंद केल्याने अनेकांनी विस्तार थांबवला आहे. योजना बंद झाल्याने उद्योगांवर विजेचा भार अधिक वाढला आहे.
- प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर उद्योग सुरळीत सुरू झाले आणि कच्चा मालाच्या दरात वाढ झाली. त्यातून मार्ग काढत उद्योगाचा गाडा पुन्हा रेटला जात असताना आता वीज सवलत रद्द करण्यात आलेली आहे. या सततच्या त्रासामुळे उद्योजकांना मनस्ताप वाढतो आहे. नैराश्याची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यातून उद्योगधंदे बंद होण्याची शक्यता आहे. तातडीने वीज सवलत सुरू करावी अन्यथा उद्योग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-नितीन लोणकर, उद्योजक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT