2350 crore in central budget for Nagpur division for railways sakal
नागपूर

रेल्वेसाठी नागपूर विभागाला केंद्रीय अर्थसंकल्पात २३५० कोटी

ऋचा खरे : अजनी स्थानकासाठी ३५ कोटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २ हजार ३५० कोटी रुपये मिळाले आहे. पायाभूत व इतर सोयींकरिता मिळालेल्या या निधीने मध्य रेल्वेकडून प्रवासी सुविधेला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर रेल्वे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी अजनी रेल्वे स्थानकाचा विकास करायचा आहे. यासाठी ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अजनी स्थानकाचा विकास सुरू आहे. मात्र, नवीन नवीन योजना येत असल्याने मुळ कामाला गती मिळत नव्हती. आता या कामाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजनी स्थानकावर विमानतळाप्रमाणे सुविधा मिळतील. त्यासोबतच नागपूर रेल्वे स्थानकाचा विकास सुद्धा जोमाने होईल. विभागात २१ हजार ८०० चौरस मीटर जागेवर अतिक्रमण असून यात १ हजार २१५ स्थळांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

नवीन रेल्वे मार्ग, आरओबी, आरयूबी, अत्याधुनिक प्रवासी सुविधा, रेल्वे स्थानकाचा विकास, वल्ड क्लास रेल्वेस्थानक आणि अजनी स्थानक सॅटेलाइट टर्मिनस म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ऋचा खरे म्हणाल्या. नागपूर-सेवाग्राम हा तिसरा रेल्वे मार्ग ७८ कि.मी. चा असून आतापर्यंत २० किलो मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

या वर्षात ३० कि.मी.चे काम करण्याचे लक्ष्य आहे. मार्च २०२४ पर्यंत तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात नागपूर विभागाने नागरिकांच्या सहकार्याने जवळपास १० लाख गरजूंना मदत केली. ऑक्सिजन स्पेशल पाठविण्यात आली. यासोबतच बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या माध्यमातून नवीन व्यवसाय आणण्याचा प्रयत्न झाला. रस्ते मार्गाने होणारी वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात आली. पत्रकार परिषदेला वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, एडीआरएम जयसिंग, पी.एस. खैरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT