नागपूर

दुर्दैवी! पूर्व विदर्भात गेल्या वर्षभरात २ हजार ४२६ चिमुकल्यांचा थांबला श्वास; २१७ माता दगावल्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. तसेच राज्यात अर्भक, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून (Health deaprtment) दरवर्षी सरासरी ३० ते ४० कोटी खर्च केल्या जाते. पण बालमृत्यूचे प्रमाण काही थांबले नाहीत. पूर्व विदर्भात गेल्या वर्षभरात २ हजार ४२६ चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर प्रसूतीदरम्यान २१४ माता दगावल्या आहेत. (2426 children are no more in one year in east vidarbha)

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही ना बालमृत्यू आटोक्‍यात आले, ना माता मृत्यू. एकूण गर्भवती स्त्रीयांपैकी ३० टक्के माता बाळंतपणादरम्यानच्या जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या एक लाख गर्भवतीपैंकी सुमारे १०० दगावतात. यात प्रसूती दरम्यान होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावाचा वाटा सर्वाधिक आहे. तर बाळंतपणात मातांचे पोषण योग्यरीत्या न झाल्याने बाळ कुपोषित जन्माला येते.

गावखेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापर्यंत ग्रामीण भागातील आशा वर्कर हीच केवळ आरोग्यसेवेसाठी पुढे आली आहे. यावर्षी कोरोना वगळता दुर्गम भागातील सर्वच अंगणवाड्यातील पोषण आहार थांबला. कमी वजनाच्या बालकांसाठी श्रेणी बदलासाठी असलेले पोषण आहार केंद्र बंद आहेत. यामुळे मृत्यूच्या वळणावर ही चिमुकली मुले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे २१७ मातांचा मृत्यू झाला. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२४ मातामृत्यूची नोंद झाली आहे.नागपूर आरोग्य विभागाचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील नोंदीवरून नवजात अर्भक, बालमृत्यू तसेच माता मृत्यूचे वास्तव प्रकाशात आले आहे.

कोरोनामध्ये व्यस्त...संचालकांना मिळेना वेळ

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र नियमित कोरोनासंदर्भात विविध बैठकांसह अन्य काम खूप असते. हे देखील मान्य आहे. मात्र इतर आजारांसंदर्भाल तक्रारी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील यांच्याकडे वेळच नाही. त्यांना माता मृत्यू, अर्भक, उपजत मृत्यू आणि बालमृत्यूसंदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला असता, त्यांचा फोन नुसताच खणखणत असतो.

(2426 children are no more in one year in east vidarbha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT