Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : ईडीच्या छाप्यात अडीच कोटी रोख जप्त ;संचालकाकडून एक कोटीचे दागिने जप्त

वीस हजार कोटी रुपयांच्या बँक गैरव्यवहारप्रकरणी अॅमटेक’च्या एसीआयएल लिमिटेडवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २० जून रोजी दिल्ली-एनसीआर, मुंबई, नागपूर येथील ४० ठिकाणांवर छापे टाकले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वीस हजार कोटी रुपयांच्या बँक गैरव्यवहारप्रकरणी अॅमटेक’च्या एसीआयएल लिमिटेडवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २० जून रोजी दिल्ली-एनसीआर, मुंबई, नागपूर येथील ४० ठिकाणांवर छापे टाकले. त्या छाप्यात ईडीच्या पथकाने २ कोटी ५३ लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक कोटीचे दागिने जप्त केले आहेत. अरविंद धाम, गौतम मल्होत्रा यांच्यासह ‘ॲमटेक ग्रुप’ आणि त्याच्या संचालकांवर छापे टाकण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

अनेक सूचीबद्ध कंपन्यांमध्ये २०,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा बँक घोटाळा झाल्याच्या आरोपाखाली ‘अॅमटेक’च्या एसीआयएल लिमिटेड या समूहाविरोधात सीबीआयने ‘एफआयआर’ दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये ‘ईडी’ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे सरकारी तिजोरीचे अंदाजे १० ते १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ‘ईडी’ने सांगितले. रिअल इस्टेट, परकीय गुंतवणूक आणि नव्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्जाच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.`

बोगस विक्री, भांडवली मालमत्ता, कर्जदार आणि नफा यांच्यावर अनुत्पादक मालमत्तेचा (एनपीए) शिक्का बसू नये आणि अतिरिक्त कर्ज मिळावे, यासाठी समूह किंवा संबंधित व्यवसाय आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र निर्माण केले जाते, शेल कंपन्यांच्या नावावर हजारो कोटींची मालमत्ता करण्यात आली होती. बेनामी संचालक आणि भागधारकांच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT