ventilator bed e-sakal
नागपूर

लाट ओसरतेय! नागपुरात २५०० खाटा उपलब्ध, व्हेंटीलेटरसह आयसीयू बेडचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरातील घटत्या कोरोना रुग्णसंख्येसोबतच (corona patients nagpur) गंभीर संवर्गातील रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. कोरोनामुक्तांचे (corona free) प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांत (government and private hospital nagpur) जवळपास २ हजार ३५० खाटा (2500 beds empty) रिकाम्या झाल्या आहेत. कोरोनाचा उद्रेक होता, त्यावेळी रुग्णांना खाट मिळत नसल्याने उपचारापासून वंचित राहिलेल्या अनेकांचे जीव कोरोनाच्या बाधेने गेले. प्रशासनाने मात्र तहान लागल्यानंतर विहीर खोदली, यामुळे या खाटांची गरज आता भासली नाही. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने या खाटांची गरज भासू शकते. मात्र, गरीब रुग्णांनी कोरोना उपचारासाठी भटकंती करून नये, मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध आहेत, असे वैद्यकतज्ज्ञांशी झालेल्या संवादातून पुढे आले. (2500 beds including ventilator and icu available in government medical college nagpur)

मार्च २०२१मध्ये शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना खाटा मिळत नव्हत्या. रुग्णवाहिकेत चार रुग्णालयांत खेटे घालूनही खाट न मिळाल्याने रुग्णवहिकेतच मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या. यानंतर प्रशासनाने विविध रुग्णालयांत खाटा वाढवण्यास सुरूवात केली. मेडिकल, मेयो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढवण्यात आल्या. शहरात १४ शासकीय, १५० वर खासगी व १६ वर कोविड केअर सेंटर (सीसीसी) मधून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये खाटांची संख्या वाढवून ९०० केली. मेयोत, ६०० तर एम्समध्येही ३०० खाटा आहेत. मेडिकलमध्ये सद्या तीनशेपेक्षा अधिक खाटा शिल्लक आहेत.सद्या खासगी रुग्णालयांतही जवळपास ऑक्सिजन असलेले १३०७, आयसीयूचे ३६१ व व्हेंटिलेटर असलेले ७ बेड गुरुवारी (ता.१३ मे) दुपारपर्यंत रिकामे होते. याच कालावधीत शहरातील मेयो, मेडिकलसह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन असलेले जवळपास ७३५, आयसीयूचे ३० व व्हेंटिलेटर असलेले ३ बेड रिकामे आहेत. शहर व ग्रामीण भागात असलेल्या सीसीसीमध्ये ऑक्सिजनच्या जवळपास १०२ वर खाटा रिकाम्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण २ हजार ५४० खाटा रिक्त आहेत.

लक्षणे आढळताच मेडिकलमध्ये या...

परिस्थिती आता सुधारत असल्याने आता खाटा शिल्लक आहेत. यामुळे कोरोनाची लक्षणे आढळताच थेट मेडिकलच्या कोविड कॅज्युल्टीत यावे. खाट उपलब्ध करून देण्यात येईल, असे मेडिसीनचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Election : कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना महायुतीची एकतर्फी लढत; पॅनल 30 मध्ये ठाकरे गटाचा शिंदे सेनेला बिनशर्त पाठिंबा!

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

Shakun Shastra : डोळे फडफडणे, तळहात खाजवणे, अंग थरथरणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रातील रहस्य काय सांगते पाहा..

Akola Political : अखेर ‘अकोट विकास मंचा’तून ‘एआयएमआयएम’ बाहेर; अकोटमध्ये सत्तेचा नवा खेळ सुरू!

SCROLL FOR NEXT