Ventilator
Ventilator  sakal
नागपूर

२८० व्हेंटिलेटर तरीही रुग्ण व्हेंटिलेटरपासून वंचित

दत्ता लवांडे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अतिदक्षता वॉर्डांच्या तुलनेत मोठ्या संख्येने व्हेंटिलेटर आहेत. पन्नास टक्के व्हेंटिलेटर कोविड हॉस्पिटलमध्ये लावण्यात आले आहेत. सारे व्हेंटिलेटर नसलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत, मात्र अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तसेच गंभीर गैरकोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत मिळत नाही. दर दिवसाला पाच ते सहा रुग्ण दाखल झाल्यानंतर अम्बुगॅगच्या भरवशावर त्यांचा श्वास सुरू असतो. यामुळे गंभीर गैरकोरोना रुग्णांचा जीव धोक्यात येत असून प्रशासन मात्र हा नजारा उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मेडिकलमध्ये पूर्वी अवघे २० खाटांचा अतिदक्षता विभाग होता. खाटांची संख्याही मर्यादित होती. अलिकडे मेडिकलमध्ये २८० व्हेंटिलेटर आहेत. सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कोविड रुग्णालय सुरू झाल्यानंतर कोरोना काळात या पन्नास टक्के ठिकाणी व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. याशिवाय मेडिकलमध्ये नवीन तीन अतिदक्षता विभाग तयार झाले आहेत. येथे ९० खाटा आहेत. मात्र रात्रीअपरात्री असो की, अचानक गंभीर झालेल्या गैररुग्णांना रुग्णांना मेडिकलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात येत नाही.

गैरकोरोना रुग्णांचा भार मेडिकलवर वाढला आहे. परंतु कोरोनासाठी इतर आजारांच्या रुग्णांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार नकळत प्रशासनाकडून होत आहे. गैरकोरोनाच्या रुग्णांचा जीव जीव टांगणीला आला आहे. खाटांच्या तुलनेत १ टक्काही कोरोनाचे रुग्ण मेडिकलमध्ये नाहीत, यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

एकच नातेवाईक दाबतो फुगा

मेडिकलमध्ये दाखल असताना प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरची गरज असते. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांच्या हाती अंबू बॅग देण्यात येते. रात्रभर अंबूबॅग दाबून रुग्णाजवळ असलेल्या नातेवाइकाचे हात दूखून जातात. हे भयावह चित्र आहे. बॅग दाबत असताना नातेवाइकाचा डोळा लागल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येतो. नव्हेतर असे मृत्यू होत असतील अशी शंका व्यक्त करण्यात आली.विशेष असे की, एकाच नातेवाईकाला पास दिली जाते. यामुळे रात्रभर एकच नातेवाईक बॅग दाबत असतो. अंबू बॅगवर असलेल्या रुग्णाजवळ दोन नातेवाइकांना राहण्याची परवानगी दिल्यास आळीपाळीने ती बॅग दाबू शकतील, अशी प्रतिक्रिया नातेवाईक व्यक्त करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT