मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी जितेंद्र मलिक (३५) हा कामाच्या निमित्ताने चिंचभवन परिसरातील खापरी पुनर्वसन भागात वास्तव्यास आहे. मंगळवारी मध्यरात्री तो घरी परतत असताना दुचाकीतील पेट्रोल संपले. 
नागपूर

बापरे! गाडी ढकलत नेणाऱ्या युवकाला आधी केली मदत अन् मग घडली भयंकर घटना  

योगेश बरवड

नागपूर ः गाडी ढकलत नेणाऱ्या दुचाकीचालकाला तिघांनी मदतीचा हात दिला, अगदी पेट्रोलही भरून दिले. नंतर मात्र चाकूचा धाक दाखवून मोटारसायकल, मोबाईल आणि सहा हजारांची रोख हिसकावून नेली. मंगळवारी मध्यरात्री बेलतरोडी हद्दीत ही घटना घडली.

मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी जितेंद्र मलिक (३५) हा कामाच्या निमित्ताने चिंचभवन परिसरातील खापरी पुनर्वसन भागात वास्तव्यास आहे. मंगळवारी मध्यरात्री तो घरी परतत असताना दुचाकीतील पेट्रोल संपले. यामुळे गाडी पायीच ओढत नेत होता. ले-मेरिडियन हॉटेलकडून वर्धा रोडकडे येणाऱ्या सिमेंट रोडवरील टी पॉइंटवर २० ते २५ वर्षे वयोगटातील तीन अनोळखी युवक मोटारसायकलने आले. 

न विचारताच त्यांनी मदतीचा हात दिला. जितेंद्रला आपल्या मोटारसायकलवर बसवून घेतले आणि दोघांनी त्याची मोटारसायकल आपल्या ताब्यात घेतली. एका वाहनाने दुसरी गाडी ओढत ते कसेबसे खापरीतील पेट्रोलपंपावर पोहोचले. तिन्ही युवकांनी जवळचे पैसे देत पेट्रोल भरून घेतले. 

त्यानंतर जितेंद्रने आपल्याकडील पैसे देऊन गाडी घेण्याचा प्रयत्न केला असता तिघांपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व त्याच्याकडील मोबाईल, मोटारसायकल व ६ हजार रुपये रोख असा एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल हिसकावून नेला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी, शरद पवारांना दिली होती सोडचिठ्ठी

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

Kolhapur Election Breaking News : सतेज पाटलांना तगडा झटका, हायव्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुख विजयी; महायुतीचा सर्व जागांवर विजय

Pune Municipal Corporation Election Results : पुण्यात पहिल्या निकालात भाजपने मारली बाजी; तीन उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला एक जागा

Nagpur Municipal Election Results 2026 : नागपूर महापालिकेचे पहिले कल समोर, भाजपची मुसंडी, तब्बल ६५ जांगावर आघाडी

SCROLL FOR NEXT