33 murders in 10 months 11 innocent victims of husband-wife dispute nagpur crime marathi news Esakal
नागपूर

Nagpur Crime : क्षुल्लक कारण व चारित्र्यावर संशय ठरतोय घातक

१० महिन्यांत ३३ हत्या; पती-पत्नीच्या वादात गेला ११ जणांचा नाहक बळी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या काही वर्षांत सामाजिक व्यवस्था अतिशय ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून क्षुल्लक वादाची परिणिती खुनात झाली असून दहा महिन्यांत क्षुल्लक भांडणातून ३३ खून झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कुठलाही वाद झाल्यास पूर्वी मार्ग काढण्यासाठी आणि दोन्ही व्यक्तीच्या मनातील द्वेष दूर करण्यासाठी वरिष्ठ मंडळींकडून समजूत घातली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत सोशल मिडियाने कौटुंबिक व्यवस्थेत बराच दुरावा निर्माण केला असून त्याचे दुश्‍य परिणाम आता समाजावर दिसू लागले आहेत. क्षुल्लक वादातून आक्रमक होत त्यातून मारहाण करीत, टोकाचे पाऊल उचलून खून करण्याइतपत मजत जात असल्याचे दिसते.

त्यातूनच गेल्या दहा महिन्यांत घडलेल्या ६८ खूनांच्या घटनांमध्ये ३३ खून क्षुल्लक वादातून झालेत. यामध्ये मुख्यतः पती-पत्नीचे वादातून अकरा खून झाल्याची माहिती आहे. याशिवाय मुलाकडून आईसोबत झालेल्या वादातून ३ खून, वडिलांसोबत झालेल्या वादातून ३ खून तर सुनेने सासूचा खून केल्याची माहिती आहे. याउलट जुन्या भांडणातून आणि जागेतून प्रत्येकी आठ खूनाची नोंद करण्यात आलेली आहे.

अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय

नात्यांत एकमेकांवर संशय आणि अनैतिक संबंधातून गेल्या दहा महिन्यांत १६ खून झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पतीने पत्नीवर घेतलेला संशय आणि पती वा पत्नीच्या अनैतिक संबंधातून हे खून झाल्याचे दिसते.

निम्म्यांची नाही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी

खुनाच्या गुन्ह्यात एकेकाळी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या गुन्हेगारांची चलती असायची. मात्र, आता ६८ पैकी ३३ खुनात गुन्हेगारी नसलेल्या व्यक्ती खुनात आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. याउलट केवळ १३ प्रकरणात दोन्ही आरोपी गुन्हेगार असल्याचे दिसून आले आहे.

अशी आहे आकडेवारी

  • क्षुल्लक कारणातून खून - ३३

  • प्रेमसंबंध, चारित्र्यावर संशय - १६

  • जुने भांडण - ८

  • जमिनीचा वाद - ८

  • दारूच्या वादातून - ३

  • एकूण - ६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT