Coronavirus sakal
नागपूर

नागपूर जिल्ह्यात महिनाभरात ३४५ कोरोनाबाधित

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेतली. मागील सात दिवसांत १७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येने उसळी घेतली. मागील सात दिवसांत १७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली.

नागपूर - कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरत असतानाच अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येने (Patients) उसळी घेतली. मागील सात दिवसांत १७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १ ते ३० डिसेंबर या कालावधीत ३४५ कोरोनाबाधित नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) आढळले. यामुळे जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली. गुरुवारी (ता.३०) दिवसभरात जिल्ह्यात नव्याने २८ बाधितांची भर पडली असून, ४ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात गुरुवारी ५ हजार १७२ चाचण्या करण्यात आल्या असून २८ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात शहरातील २६ व जिल्ह्याबाहेरील २ जण आहेत.यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९३ हजार ९५९ झाली आहे. आज चार जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्तांची ४ लाख ८३ हजार ६३८ झाली आहे. जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सद्यस्थितीत शहरात १६८, ग्रामीणमध्ये १५ व जिल्ह्याबाहेर १६ असे १९९ सक्रिय कोरोनाबाधित जिल्ह्यात आहेत. यापैकी लक्षणे नसलेले संस्थात्मक विलगीकरणात तर लक्षणे असलेले शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.ओमिक्रॉनचे कोरोनाचे आजवर जिल्ह्यात ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, पुन्हा चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT