सावजी google
नागपूर

‘लंबडी को...लॉकडाउनं वाट लगादीस’, ५० टक्के सावजीला टाळे

राजेश रामपूरकर

नागपूर : विदर्भातील झणझणीत ‘सावजी’ला (nagpur saoji) टाळेबंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेकांनी स्वयंरोजगारासाठी भाडेतत्वावर जागा घेऊन हॉटेल सुरू केलीत. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांचा व्यवसाय (lockdown effect on saoji) तोट्यात गेला. परिणामी, अनेकांना भाडे देणेही शक्य होत नसल्याने काही जागा मालकांनी हॉटेलचे साहित्य जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे शहरातील ५० ते ६० टक्के सावजी हॉटेलला टाळे लागल्याने पाच ते सहा हजार लोकांचा रोजगार गेला आहे.

सावजी म्हणजे केवळ मांसाहारी पदार्थ नसून डाळकांदा, पाटवडी, खसखसची भाजी, भरल्या वांग्याची भाजी या पदार्थांचा सुद्धा समावेश होतो. या खाद्य पदार्थांची ग्राहकांची आवड लक्षात घेता पंचतारांकीत हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्येही सावजी डिशने स्थान पटकावले आहे. श्रावण महिन्याचा अपवाद सोडला तर उर्वरित काळात या पदार्थाची मागणी कायम वाढतीच असते. सलग दीड वर्षांपासून टाळेबंदीमुळे सावजी हॉटेल व्यावसायिक अडचणीत आल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शहरात सुमारे २०० ते २२५ सावजी हॉटेल आणि खानावळी आहेत. पूर्वी एका हॉटेलचा महिन्याचा व्यवसाय हा सरासरी दीड ते दोन लाखाचा होता. आता तो फक्त तीस टक्क्यावर आला असून शहरातील १०० पेक्षा अधिक हॉटेल्सही बंद पडलेले आहेत. त्यामुळे पाच ते सहा हजार कामगारांचा रोजगार गेला आहे.

सावजीचा इतिहास -

सावजी खाद्यपदार्थाला मोठा इतिहास आहे. पूर्वी नागपुरात मोठ्‍या संख्येने कापड गिरण्या होत्या तेव्हा मध्य प्रदेशातून काही हलबा कोष्टी बांधव कामासाठी नागपूरमध्ये आले आणि येथेच स्थायिक झाले. सुट्टीच्या दिवशी रात्री ते सर्व मिळून एकत्र जेवायचे. त्यातूनच सावजी पदार्थाचा जन्म झाला. पुढे गिरण्या बंद झाल्या. पोटापाण्यासाठी काही लोकांनी ‘सावजी’ पदार्थाच्या खानावळी सुरू केल्या.

सावजी ‘हब' - नोटबंदी आणि आता टाळेबंदीच्या चक्रव्यूहात हे हॉटेल्स सापडले आहेत. काही महिने सावजी हॉटेल चालकांनी टाळेबंदी उठेल म्हणून वाट पाहिली. मात्र, तब्बल दीड वर्षापासून हॉटेल बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.
-जगदीश खापेकर, अध्यक्ष, सावजी भोजनालय असोसिएशन
टाळेबंदीमुळे दीड वर्षांपासून सावजी हॉटेल बंद होते. आता सुरळीत सुरू झाले असले तरी हवा तसा व्यवसाय नाही. त्यामुळे कामगारांचा पगारच काय भाड्याने जागा घेतलेल्या जागेचे भाडेही देणे अशक्य आहे.
-दीपक लिमजे, संचालक जगदीश सावजी , शुक्रवारी तलाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT