दोन हात कुपोषणाच्या समस्येशी  e sakal
नागपूर

लॉकडाउनमुळे वाढले कुपोषण, ५५० बालके कुपोषणाच्या विळख्यात

निलेश डोये

नागपूर : लॉकडाउनमुळे (lockdown) अंगणवाड्या बंद असल्याने मुलांना घरपोच कडधान्य देण्यात येत आहे. या कडधान्याचा उपयोग घरातील सर्वच सदस्य घेत असल्याने त्यांना पुरेसा आहार मिळत नाही. त्यामुळे कुपोषण वाढले (malnutrition increase) आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात मे महिन्यामध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ४५८ व अति तीव्र कुपोषित ९० (सॅम) अशी तब्बल ५४८ बालके कुपोषणाच्या छायेत आढळून आली आहेत. (550 child suffering from malnutrition due to lockdown in nagpur)

अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत पोषण आहारही देण्यात येतो. जिल्ह्यात २३२५ वर अंगणवाड्या आहेत. यात १ लाख ३८ हजारावर ९५३ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. कोरोनामुळे जिल्ह्यात गतवर्षातील मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद आहेत. पण बालकांना पोषण आहाराच्या रूपात कडधान्य त्यांना घरपोच दिले जात आहे, असा दावा महिला बाल कल्याण विभागाचा आहे.

वर्ष २०२१ च्या मे महिन्यात घेतलेल्या आढाव्यात कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे. मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू असल्याचा दावा विभागाचा आहे. बालकांना कडधान्याच्या रूपात पोषण आहार येत आहे. यात चणा डाळ, मसूर डाळ, तिखट, हळद, साखर, गहू आदींचा समावेश आहे. परंतु, यातून तेल मात्र, काही महिन्यांपासून वगळण्यात आले आहे.

तालुकानिहाय कुपोषणाची स्थिती

तालुका मॅम सॅम

  • पारशिवनी १६ १२

  • हिंगणा ५० २०

  • नागपूर ६४ ०४

  • मौदा १८ ०३

  • कामठी ७२ ०७

  • रामटेक १२ १३

  • उमरेड १६ ०८

  • सावनेर ५० ०७

  • भिवापूर ३२ ०२

  • नरखेड १८ ०२

  • कुही १४ ०८

  • काटोल २६ ०३

  • कळमेश्वर २९ ०८

अपुऱ्या आहारामुळे वाढले कुपोषण अंगणवाड्या असल्याने आता मुलांना घरीच कडधान्य दिले जात आहे. ते घरातील सर्वच जण घेतात. त्यांना पुरेसा आहार मिळत नाही. त्यामुळे कुपोषण वाढत आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. आई शेताच्या कामात असल्यानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.
उज्ज्वला बोढारे, सभापती, महिला व बाल कल्याण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT