56 bjp party worker including ex mayor enters into ncp in wadi of nagpur 
नागपूर

माजी नगराध्यक्षांसह ५६ जणांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत केला प्रवेश

विजयकुमार राऊत

वाडी (जि. नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या कार्यप्रणालीला वैतागलेले भाजपचे माजी जिल्हा महामंत्री आणि माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह ५६ बुथप्रमुखांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश करण्यात आला. हिंगणा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०२४ साली आपल्याला तिथे विजय मिळवायचा आहे, यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवीन पक्ष सदस्यांना केले. भाजप १५ वर्षे विरोधात असताना तुम्ही तो पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. असे असतानाही इतर पक्षातून भाजपात आलेल्यांना तिकिट देऊन भाजपाने निष्ठावंत नेत्यांवर अन्याय केला. इथे मात्र असे होणार नाही, अशी खात्री पाटील यांनी झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला फार मान आहे. पक्षात कार्यकर्ता जपण्याचे काम होते. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला संधी मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला. 

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात, त्या पक्षाला ताकद देण्याचे काम केले. मात्र, त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, अभय कुणावार, नगरसेवक हिंमत गडेकर आणि भाजपच्या बुथप्रमुखांसह हिंगणा मतदारसंघातील ५६ बुथप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रवीण मांडे, प्रा. सुरेंद्र मोरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT