60 percent family animal farming milk business agriculture nagpur Sakal
नागपूर

Nagpur News : दुग्ध व्यवसायामुळे जंगलावरील अवलंिबत्व झाले कमी; ६० टक्के कुटुंबाने साधला पशुपालनातून उत्कर्ष

दररोज सरासरी २७५ ते ३०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. आवळेघाट गावात शिवस्वराज्य बहुउद्देशीय विकास निर्माण कंपनीची नोंदणी केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पारशिवनी तालुक्यातील जंगलाशेजारील आवळेघाट, चारगाव आणि मकरधोकडा हे तीन गाव. या गावांची दिनचर्या पूर्ण जंगलावर अवलंबून होती. आता मात्र, या गावांचे दुग्ध व्यवसायातून अर्थकारण बदलले.

येथील ६० टक्के कुटूंब पशुपालनात आले आहेत. एका वर्षातच दूध व्यवसायातून गावातील तरुण पिढी शेतीसोबत दूध व्यवसायात गुंतली. एकमेकांच्या सल्ल्याने अनेक शेतकरी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकाराने गाईंच्या संख्येत वाढ करत आहे.

नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव) अंतर्गत येत असलेल्या आवळेघाट, चारगाव आणि मकरधोकडा या गावाला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत २०२३ मध्ये २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून ३६ गायींचे वाटप करण्यात आले.

दररोज सरासरी २७५ ते ३०० लिटर दुधाचे संकलन होत आहे. आवळेघाट गावात शिवस्वराज्य बहुउद्देशीय विकास निर्माण कंपनीची नोंदणी केली. दूध खराब होऊ नये म्हणून दूध थंड करण्याकरिता एक हजार लिटरची कुलिंग मशिन खरेदी केली. ते दूध आता दिनशॉ एजन्सी नगरधन येथे विकले जाते. यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.

गावातील शेतकऱ्यांचे जंगलावरील अवलंबत्व कमी झालेले आहे. या गावातील नागरिकांना अधिक रोजगारनिर्मिती होण्याकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर कडून २०२४ मध्ये एकूण निधी २४ लाखाचा निधी मिळाला आहे. त्यातून या गावामध्ये ३१ गायींचे वाटप करण्यात आले आहे. आता सद्या सरासरी ३०० लिटर दूध संकलन होत आहे असे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT