नागपूर

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाला सुवर्णाक्षरांचा साज!

नरेंद्र चोरे

नागपूर : देशभक्ती व्यक्त करण्याची अनेक माध्यमे असतात. कुणी चेहऱ्यावर तिरंगा चितारून देशभावना व्यक्त करतो, तर कुणी देशभक्तीपर गीते सादर करून देशाबद्दल प्रेम व अभिमान व्यक्त करतो. मात्र, नागपुरात असे एक असीम राष्ट्रभक्त आहेत ज्यांनी सुवर्णाक्षरांनी फ्रेमवर वंदेमातरम हे जगप्रसिद्ध गीत साकारून मातृभूमीविषयी असलेले प्रेम व्यक्त केले आहे. ८० वर्षांचे चंद्रकांत अंभईकर यांनी साकारलेल्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वावलंबीनगर येथे राहणारे ८० वर्षीय चंद्रकांत अंभईकर यांना विविध वस्तू, चित्र, फ्रेम्स व मूर्ती बनविण्याची आवड आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी अशीच एक कलाकृती तयार केली आहे. त्यांनी बकिमचंद्र चॅटर्जी लिखित लोकप्रिय ठरलेले वंदेमातरम हे गीत २ फूट बाय १४ इंच आकाराच्या चौकटीत (फ्रेम) बसविले आहे. त्यावर गोल्ड प्लेटेड लाकडाचे इंग्रजी अक्षर चिपकविले असून, विशिष्ट बेकलाईट शीटचा वापर केला आहे.

शिवाय काचेच्या फ्रेमवर तिरंगा आहे. ३३५ शब्दांचे हे गीत साकारण्यासाठी जवळपास तीन महिन्यांचा अवधी लागल्याचे अंभईकर यांनी सांगितले. मुलगी पूर्वा माटेसोबत 'सकाळ'च्या रामदासपेठस्थित कार्यालयात येऊन त्यांनी ही कलाकृती दाखविली. देशवासीयांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा या भेटीची जपणूक करणाऱ्या व्यक्तीच्या सुपूर्द ही कलाकृती करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

अंभईकर आतापर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती साकारल्या आहेत. जमशेदजी टाटा यांचा ॲल्युमिनिअम कास्टिंगचा अर्धपुतळा बनविला होता, जो सध्या मुंबईच्या टाटा हाउसची शान वाढवीत आहे. सध्या ते स्वामी विवेकानंदांची धातूची मूर्ती तयार करीत आहेत. येत्या २६ जानेवारीला राष्ट्रगीतावर आधारित कलाकृतीही तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

इंदिराजींनी केले होते कौतुक

अंभईकर यांनी ३७ वर्षांपूर्वी 'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा भारताच्या नकाशावर कोरली होती. ही कलाकृती त्यांनी नागपूर भेटीवर आल्या असता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत राणी कोठी येथे भेट दिली होती. त्यावेळी इंदिराजींनी 'बहोत बढिया हैं, थँक्स चंद्रकांतजी' अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले होते. तो क्षण आयुष्यात मी कदापि विसरू शकत नाही, असे अंभईकर यांनी सांगितले. बाबा आमटे यांनीही त्यांची पाठ थोपटलेली आहे.

गायनाचीही आवड जपलीय

शासकीय आयटीआयमध्ये मोल्डर इंस्ट्रुक्टर राहिलेल्या अंभईकर यांना राष्ट्रगीते गाण्याची व गीत लेखन करण्याचीही आवड आहे. त्यांचा राष्ट्रज्योत नावाचा ऑर्केस्ट्रा आहे. या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांसह ठिकठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा ते प्रयत्न करीत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT