file image canva
नागपूर

का साजरा केला जातो अग्निशमन सेवा दिन, शहरात वर्षभरात तब्बल ७८९ आगीच्या घटना

अग्निशमन सेवा दिन विशेष

राजेश प्रायकर ः @rajeshp_sakal

नागपूर : आगीशी झुंज देत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या महापालिका अग्निशमन विभागातील जवानांनी मागील वर्षी कोरोनावर नियंत्रणासाठी धावाधाव केली. अनेक वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशन करून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. त्याचवेळी गेल्या वर्षभरात ७९८ आगीच्या घटनांवरही मात करीत वित्त व जीवही वाचविले. संकटकाळात धावून येणाऱ्या या विभागाकडे पुरेसे मणुष्यबळही नाही.

मागील १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च या वर्षात शहरात लहान, मोठ्या ७८९ आगीच्या घटना घडल्या. यात १३ कोटी २६ लाख ९१ हजार आठशे रुपयांची मालमत्ता जळून राख झाली. परंतु, यापेक्षाही अधिक १३९ कोटी ६८ लाख रुपयांची मालमत्ता वाचविली. शहराबाहेर ६४ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवत ५० कोटींची मालमत्ता सुखरूप राखली. मागील वर्षात संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना अग्निशमन जवानांनीही या संघर्षात मोलाचे कार्य केले. नागरिक, लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर आग विझविणारे बंब घेऊन हे जवान वस्त्यांमध्ये सॅनिटायझरचे बंब घेऊन जाताना दिसले. कामात नेहमीच पुढे असलेल्या या जवानांची मात्र मनुष्यबळ तोकडे असल्याने विश्रांतीच्या दिवशीही कर्तव्यावर हजर राहावे लागत आहे. राज्य सरकारने अग्निशमन विभागाचा आकृतीबंध मंजूर केला. भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला. परंतु स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाकडून याबाबत उदासिनता दिसून येत आहे.

हेही वाचा - भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित

अभिमानाचे वर्ष -

महापालिका अग्निशमन विभागासाठी मागील वर्ष अभिमानाचे ठरले. विभागातील नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रांचे सेवानिवृत्त सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी धर्मराज. नाकोड यांना २६ जानेवारीला अग्निशमन सेवेतील गुणवत्तापूर्वक कामगिरीसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

आगीच्या प्रमुख घटना -

वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत छावणीत एका दुकानाला लागलेल्या आगीत महिला ठार झाली. याशिवाय महालगाव कापसीतील आरा मशीन तसेच एमआयडीसीत लागलेली आग मागील वर्षातील प्रमुख घटना आहे. कोरोनामुळे मागील वर्षी आगीच्या घटनांतही घट झाल्याचे दिसून येते.

का साजरा केला जातो अग्निशमन सेवा दिन -

१४ एप्रिल १९४४ मध्ये लंडनवरून मुंबईत दाखल झालेल्या जहाजात स्फोट होऊन आग लागली. ही आग विझविताना अग्निशमन विभागाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १४ एप्रिलला अग्निशमन सेवा दिन साजरा केला जातो.

हेही वाचा - नागपुरात ऑक्सिजन प्लांट स्थापनेला राज्य सरकारची मंजुरी, राज्यात इतरत्रही प्लांट उभारण्याचा विचार

नव्या वर्षात विभागाला बळकट करण्यात येत असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निरोधक फायरसूट खरेदी करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, झोपडपट्टी, बाजारपेठांमध्ये आगीवर नियंत्रणासाठी ३२ मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म वाहन यंदा ताफ्यात दाखल होणार आहे.
- राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT