lender sakal
नागपूर

८ लाख नागरिक सावकारांच्या दारात; १७५५ कोटींचे कर्ज; पाचशे कोटींची वाढ

कर्ज मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावरच गरजू व्यक्ती परवानाधारक अथवा खासगी सावकाराकडे कर्जासाठी जाते.

सूरज पाटील

यवतमाळ : कर्ज मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावरच गरजू व्यक्ती परवानाधारक अथवा खासगी सावकाराकडे कर्जासाठी जाते. खासगी सावकारांचा व्याजदर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने परवानाधारकांना पहिली पसंती दिली जाते. २०२१ या वर्षांत सात लाख ८८ हजार ७०६ नागरिकांनी १२ हजार परवानाधारक सावकारांकडून एक हजार सातशे कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती आहे.

कृषी व बिगर कृषी पतपुरवठा संस्थांशिवाय परवानाधारक सावकारांना वैयक्तिक कर्जाचे वाटप करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयामार्फत परवाने दिले जातात. परवानाधारक सावकार कृषी व बिगर कृषी कामासाठी पतपुरवठा करतात. सन २०२० मध्ये राज्यात परवानाधारक सावकारांची संख्या १२ हजार ९९३ होती. २०२१ मध्ये ही संख्या १२ हजारांवर आली. मात्र, २०२० पेक्षा कर्ज घेणाऱ्यांची संख्या दीड लाखाने वाढली आहे. २०२० मध्ये एक हजार २३५ कोटी ३८ लाखांचे कर्ज सावकारांनी दिले होते. तर, २०२१ मध्ये एक हजार ७५५ कोटी २५ लाखांचे कर्ज त्यांनी दिले आहे. सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातून हे वास्तव समोर आले आहे.

शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, खासगी व राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जवाटप केले जाते. मात्र, अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत असल्याने त्यांना सावकाराच्या दारात जावे लागते. खासगी सावकारांकडून शेतकऱ्यां‍ची सर्वाधिक पिळवणूक होते. याची नोंदणी कुठेही होत नसल्याने हा आकडा गुलदस्त्यातच राहतो.

सावकारी कर्ज किती?

सन २०२० २०२१

सावकारांची संख्या

१२,९९३ १२,००१

कर्जदार

६,२३, ४१८ ७,८८,७०६

कर्जवाटप

१२३५.३८ १७५५.२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT