नागपूर

वय ८० वर्ष, HRTC स्कोर २० तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आजींची कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः घरातील एकालाही कोरोनाची (Corona) बाधा झाल्यास संपूर्ण कुटुंबाचेच मनोबळ गळून पडते. पण, ८० वर्षीय लीलाबाई रामटेके यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर यशस्वी मात देत इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी उपचारासोबतच सकारात्मक विचार (Positive Thinking) , नियमित ध्यानसाधना लाभदायी असल्याचा सल्ला त्या देतात. (80 year old women defeat corona even in worst conditions)

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात दक्षता विभागात कार्यरत संजय रामटेके यांच्या आई लीलाबाई बाधित झाल्या. सिटी स्कॅन केला असता एचआरसीटी स्कोर २० आढळला. त्यांना ऑक्सिजनसह आयसीयू बेडची गरज होती. आईला चांगले उपचार मिळावेत यासाठी दोन्ही मुलांनी खासगी रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवल्या. पण, कुठेही बेड उपलब्ध नव्हते. आजारपणातही रेल्वे रुग्णालयातच उपचार घेण्यासाठी लीलाबाई आग्रही होत्या. त्यांच्या इच्छेप्रमाणेच अखेर २१ एप्रिल रोजी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संक्रमण बरेच वाढले असले तरी लीलाबाईंनी हिम्मत सोडली नाही. इच्छाशक्ती, प्रोटीनयुक्त आहार तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या उपचार घेत राहिल्या. उपचारांना प्रतिसाद देत त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांची पुढील तपासणी निगेटिव्ह आली. शुक्रवारी (ता.७) त्यांना सुटी देण्यात आली. रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफने त्यांना निरोप दिला. लीलाबाईंनीही उपचार करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दोन्ही मुले प्रकाश आणि संजय रामटेके यांच्यासोबत त्या घरी परतल्या.

सकारात्मकता, ध्यान साधना ठरली लाभदायी

कोरोना अन्य आजारांसारखाच आहे. त्यामुळे भीती बाळगू नका, धैर्य ठेवा. आपल्या मनाला शांत ठेवा. योग्य आहार घ्या. ध्यान करा, सकारात्मक रहा आणि आपल्या डॉक्टरवर विश्वास ठेवा. या सूत्रांचा अवलंब केल्याने कोरोनावर विजय मिळविणे शक्य आहे, असे लीलाबाई रामटेके यांनी सांगितले.

(80 year old women defeat corona even in worst conditions)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT