Buddha Purnima 2024 esakal
नागपूर

Buddha Purnima 2024 : बुद्ध जयंतीनिमित्त आज बनवणार विश्वविक्रमी २,५८६ किलो खीर

Buddha Purnima 2024 : उत्तर नागपुरातील बेझनबाग पटांगणावर जागतिक स्तरावरचा विक्रम नोंदविण्यासाठी आज, २३ मे रोजी खीर उपक्रमाचा संकल्प केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Buddha Purnima 2024 : दोन हजार लिटर दूध, तिनशे किलो साखर, ५० किलो काजू, ५० किलो बदाम, ५० किलो मनुका, २० किलो चारोळी आणि २० किलो खोबरा किस या पोषक पदार्थाच्या मिश्रणातून दोन हजार ५८६ किलोंची खीर उपराजधानीत तयार होणार आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २ हजार ५८६ व्या जयंतीचे औचित्य साधून हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी सदर उपक्रम असल्याची माहिती चक्रवर्ती फाउंडेशन, भीम वादळ या संघटनेचे प्रतीक इंदूरकर यांनी दिली.

उत्तर नागपुरातील बेझनबाग पटांगणावर जागतिक स्तरावरचा विक्रम नोंदविण्यासाठी आज, २३ मे रोजी खीर उपक्रमाचा संकल्प केला आहे. सोबतच ५०० भिख्खूंच्या उपस्थितीत २४ तासांचा महापरित्रणपाठ याच पटांगणावर होईल. बौद्ध धर्मातील सर्व सुत्ताचे पठण भिक्खू संघ करेल. यासाठी ५०० बौद्ध भिक्खूच्या सहभागासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध उपासक उपस्थित राहणार असल्याचे इंदूरकर यांनी सांगितले.

आयोजन समितीचे प्रमुख प्रतीक इंदूरकर असून, समितीत गणेश चाचेरकर, भीम वादळ, जितू बनसोड, रवींद्र ठवरे, राकेश निकोसे, बाबू खान, निखिल वानखेडे, राज डोंगरे, उद्देश भिवगडे, संजिवनी मंच, मानव अधिकार संरक्षण मंच, अंकित राऊत समिती सदस्य आहेत.

खिरीचे विहारांमध्ये वाटप

नागपुरातील प्रत्येक विहारातून बौद्ध भिक्खू येणार आहेत. बौद्ध उपासक व उपासिका सहभागी होतील. या जयंती सोहळ्यात नागपूर शहरातील बौद्ध उपासक सहभागी होती. तर नागपुरातील प्रत्येक बुद्ध विहारात संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने खीर वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT