file photo 
नागपूर

आज इतनी भी मयस्सर नहीं मयखाने में...

मिलिंद लोहे

नागपूर : 'आज इतनी भी मयस्सर नहीं मयखाने में, 
जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने में' 
लॉकडाउन कालावधीत मद्याची दुकाने बंद असल्याने मद्यपींची अवस्था काहीशी अशीच आहे. 'एकच प्याला'साठी कुणी देशी दारूचे दुकान फोडत आहे तर 'थोडी सी तो पिली है' म्हणत दारूऐवजी सॅनिटायझर पिऊन नशा करताना दिसत आहेत. काहींनी बिसलरीच्या बॉटलमध्ये मद्यपुरवठा करून वरून पाणी टाकण्याची गरजही ठेवलेली नाही. 
शहरात सर्वत्र संचारबंदीत 'पहला नशा' कधी बघितला नसल्यासारखे 'शराबी' सेटिंग लावताना दिसत आहे. घरचा, मित्रांजवळील स्टॉक रिता झाला आहे. ज्यांच्याकडे अजूनही शिल्लक आहे ते 'हुई महेंगी बहोत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो' म्हणत रसद पुरवत आहेत. चढ्या दराने कुठे मिळत असेल तर बघा ना असेही शक्‍य न होणारे संवाद ऐकायला मिळत आहेत. तर आवाक्‍याबाहेरचे दर ऐकून त्यांनी 'कौन कमबख्त बर्दाश्‍त करने को पीता है' असे म्हणत स्वत:वर 'ताबा' मिळविला आहे. 
मित्रांनी काही 'भट्टी' जमविलीच तर 'जहॉं चार यार मिल जायें' म्हणत मध्यरात्रीपर्यंत फेसाळलेले ग्लास रिते करून 'दमलेल्या बाबाची कहाणी' कुटुंबीयांसमोर खास या अंदाजात सांगतात '...फिर भी कोई पिलाए तो मैं क्‍या करूँ.' तर काही मिलिटरी कॅटिंगमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला काही जमतेय का म्हणून 'सॅल्युट' ठोकत आहे. 

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे ट्विट 
संचारबंदीत शासनाने संध्याकाळी काही परवानाधारक मद्याची दुकाने संध्याकाळी उघडली पाहिजेत, असे ट्विट दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी करून तळीरामांना दिलासा दिला होता. परंतु त्यांनीच अनेक सिनेमातून 'मुझे पिने का शौक नही' म्हणत 'तूने नहीं पी, हॉं मैंने पी हैं जिसने भी पी ये आदत बुरी है' असे चाहत्यांना न पिण्याचे आवाहन करत 'नसीब' आजमावले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 world Cup : भारतासाठी दोन वर्षात एकही सामना खेळला नाही, आता थेट टी-२० विश्वकप संघात मिळाली संधी, कोण आहे तो खेळाडू?

Nashik Municipal Election : नाशिकच्या रणधुमाळीत तरुणांना 'अच्छे दिन'! निवडणुकीमुळे सोशल मीडिया हँडलर्सना मोठी मागणी

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे पुण्यातील नागरिकांच्या भेटीसाठी

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

SCROLL FOR NEXT