Abhijit Vanjari also the second choice of voters 
नागपूर

पदवीधर निवडणूक : मतदारांची दुसरी पसंतीही वंजारी यांनाच; भाजपला अतिआत्मविश्वास नडला

राजेश चरपे

नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांची पहिल्या पसंतीसोबतच दुसरी पसंतीसुद्धा काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारीच असल्याने त्यांचा विजय अधिकच सोपा झाला. वंजारी यांना दुसऱ्या पसंतीची तब्बल पाच हजार ६५३ तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना फक्त १,२०९ मते पडली.

पदवीधर निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय चुरशीचा सामना झाला. पहिल्या पसंतीमध्ये वंजारी यांना ५५ हजार ९४७ तर जोशी यांना ४१ हजार ५४० मते पडली. दोघांनाही ६० हजार ७४७ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली. एकूणच दुसऱ्या क्रमांकाच्या मोजणी काहीतरी चमत्कार होईल आणि धक्कादायक निकाल लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. अनेकांची धाकधूक वाढली होती.

दुसरी पसंती कोणाला याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येथेच भाजपची फसगत झाली आणि त्यांना अतिआत्मविश्वास नडला. आपण पहिल्याच क्रमांकाच्या पसंतीने निवडून येऊ, असा विश्वास संदीप जोशी आणि त्यांच्या चमूला होता. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्याची फारशी तसदी घेतली नाही.

माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चाणाक्ष नेता आणि जिल्हा परिषद ते विधान परिषदेच्या निवडणुकीचा गाढा अनुभव असणारे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक प्रमुख असताना ही बाब कोणाच्याच लक्षात कशी आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

मतदार यादी नवीन होती, अनेक भाजप समर्थकांची नावे त्यातून गहाळ होती हे ठाऊक असतानाही पहिले नाही तर किमान दुसऱ्या क्रमांकाच्या मतांसाठी काही उमेदवारांना गाठून मत मिळवण्याचे नियोजनसुद्धा कोणी केले नाही.

वंजारी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर

पहिल्या पसंतीचा कोटा कोणाला गाठता आला नसल्याने नऊ उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. शेवटच्या १० उमेदवारांना बाद करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते वंजारी आणि जोशी यांना देण्यात आली. त्यातही पहिल्या फेरीपासून वंजारी आघाडीवर होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT