file photo 
नागपूर

पहिल्या माळ्यानंतर दुसऱ्यावर एसीबी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेतील पहिल्या माळानंतर आता दुसऱ्या माळ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक देत वर्ग 1 च्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. ग्रामीण विकासाचे केंद्र, मिनी मंत्रालय समजले जाणारी जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचेही केंद्र बनत चालली आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान सीईओ योगेश कुंभेजकर यांच्यापुढे आहे. 
जिल्हा परिषदतील नवीन इमारत तीन माळ्यांची आहे. पहिल्या माळ्यावर पदाधिकाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. तर दुसऱ्यावर चार तर तिसऱ्यावर तीन अधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. तिसऱ्या माळ्यावर सीईओ यांचे कार्यालय आहे. याआधी पहिल्या माळ्यावर एसीबीने धडक देत पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांना कक्षातच अटक केली होती.

या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर वित्त विभागातील एका वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला अटक झाली होती. आता दुसऱ्या माळ्यावरील वर्ग 1 दर्जाचे अधिकारी कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना एबीसीने अटक केली. त्यांना सीईओंच्या कार्यालयात ताब्यात घेण्यात आले. 
जिल्हा परिषदेतील अनेक विभागात "अर्थकारण' चालत असल्याचे सांगण्यात येते. काहींच्या मते तर "वजन'शिवाय कामच होत नाहीत. तत्कालीन सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कारवाईचा धडाका लावत अनेक ग्रामसेवक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतरचे सीईओ संजय यादव यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. याचा फायदा अनेकांनी घेतल्याचे सांगण्यात येते. यामुळे कार्यालयातील "अर्थचक्र' पुन्हा फिरू लागले. टाकळीकरांच्या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT