Accident  esakal
नागपूर

Accident : मुलीच्या डोळ्यासमोर वडिलांना वाहनाने चिरडले

खापरी येथे भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पाच वर्षीय मुलीच्या डोळ्या देखत भरधाव मालवाहू वाहनाने तिच्या वडिलांना चिरडले. यात जागीच वडिलांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खापरी नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी घडली. अतुल भागवत बांते (३१) रा. खापरी पुनर्वसन असे मृताचे नाव आहे.

अतुल हे लहान मुलीला खापरी, वर्धा रोडवर गेले होते. ते गेटवेल रुग्णालयात ऑपरेटर होते. त्यांची पत्नी सीमा केअर रुग्णालयात परिचारिका आहे. अतुल आणि सीमाला गुर्वी (५) आणि जान्हवी (१८ महिने) या दोन मुली आहेत. बुधवारी प्रकृती अस्वस्थ असल्याने अतुलने कामावरून सुटी घेतली होती. सीमा बसने कामावर गेली होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सीमा आपली बसमध्ये बसून खापरीसाठी निघाली.

तिला घेण्यासाठी अतुल गुर्वीसह दुचाकीने खापरी नाक्याजवळ आले. एनएच-७ बीअर शॉपीसमोर वाहन उभे केले. गुर्वीला त्यांनी वाहनावरच बसवून ठेवले. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या मालवाहूच्या चालकाने त्यांना जबर धडक दिली आणि फरार झाला. घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. या दरम्यान सीमाची बसही तेथे पोहोचली. काय झाले हे पाहण्यासाठी ती गेली असता

मुलीच्या डोळ्यासमोर वडिलांना वाहनाने चिरडले

अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्याचवेळी लकडगंज विभागाचे एसीपी सचिन थोरबोलेही रस्त्याने जात होते. अपघात झाल्याचे पाहून त्यांनी वाहन थांबविले. तत्काळ अतुलला आपल्या वाहनातून खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस पोहोचले. अतुलचे वडील भागवत बांते यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. अतुलच्या मृत्यूने बांते कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT