Samruddhi Expressway Accident sakal
नागपूर

Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, दोन जण गंभीर

Accident: नियंत्रण सुटलेल्या ट्रॅव्हल्सने सदर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : नागपूर कॉरिडोवरील चॅनल नंबर ३१८ वर पुसदकडे धावणाऱ्या अंबारी कंपनीच्या खासगी ट्रॅव्हलने रायपूर (छत्तीसगड) ला जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

यामध्ये ट्रॅव्हल चालक व वाहक यांना गंभीर जखमी झाले असून त्यांना बिबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना आज १८ जून रोजी सकाळी साडेचार वाजता दुसरबीड टोलनाक्यापासून जवळच असलेल्या केशवशिवणी फाट्यानजीक घडली.

याबाबत सविस्तर असे की, अंबारी कंपनीच्या एमएच ३७ टि ८००० क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्स चालक महादेव मोतीराम राऊत (वय ३५) रा.पुसद हा २० प्रवासी सह पुण्यावरून पुसदकडे येत होता.

समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर ३१८ नागपूर कॅरिडोर नजीक त्याचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान समोरील सिजी ०७ बिइ ८५२१ क्रमांकाचा ट्रक हा छत्रपती संभाजीनगरवरून रायपूर (छत्तीसगड) कडे जात होता. नियंत्रण सुटलेल्या ट्रॅव्हल्सने सदर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

सदर अपघातामध्ये ट्रॅव्हल चालक महादेव मोतीराम राऊत हा गंभीर जखमी झाला असून क्लीनर नामे ज्ञानेश्वर वानखेडे हा किरकोळ जखमी झाला आहे

. यावेळी समृद्धी महामार्गावरील पोलिस निरीक्षक जितेंद्र राऊत, पोलिस निरीक्षक शैलेश पवार यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलातील जवानांनी सदर जखमींना रुग्णवाहीकेच्या मदतीने सामान्य रुग्णालय बिबी येथे प्रथमोपचारासाठी पाठविले. तसेच अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूस करून सदर अपघाताबाबत किनगावराजा पोलिस स्टेशन यांना फोन द्वारे माहिती देत वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT