Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg Accident Esakal
नागपूर

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Samruddhi Mahamarg Accident: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. काल संध्याकाळी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव स्कॉर्पिओ उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहीती आहे. अपघातातील जखमींनी उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

नागपूरहुन मुबईच्या दिशेने जात असताना राजेवाडी परिसरात स्कॉर्पिओ अचानक उलटून हा अपघात झाला आहे. अमरसिंग सवकीलाल सिंग असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील राहिवासी आहे. तसेच वीरेंद्र सिंग आणि राजे सिंग हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अमरसिंग सवकीलाल सिंगला तपासून मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावरील आपघातांची संख्या वाढताना दिसून येत आहेत. मध्ये प्रामुख्याने अतिवेग हेच कारण दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT