accused arrested for set fire Store when girlfriend stopped talking  Sakal
नागपूर

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

प्रेयसीने बोलणे बंद केल्याने ती ज्या दुकानात काम करीत होती,चक्क ते दुकानच पेटवून दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने ती ज्या दुकानात काम करीत होती,चक्क ते दुकानच पेटवून दिले. ही खळबळजनक घटना तहसील पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला अटक केली. प्रकाश रमेश चट्टे रा. आजरी-माजरी असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दुकान मालक रितेश सुदामा मकीजा रा. वर्धमाननगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

मकीजा यांचे बोहरा मशीद गल्लीत स्टेशनरीचे दुकान आहे. मकीजा ३० एप्रिलच्या रात्री दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली.

रितेश तत्काळ दुकानात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांसह अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मार करून आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. संपूर्ण दुकान जळून राख झाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना एका संशयित तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दुकानाच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकताना दिसत होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रकाशला अटक केली.

चौकशीत त्याने रितेश यांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर त्याचे प्रेम होते. मात्र काही कारणांमुळे प्रेयसीने त्याच्यापासून दुरावा केला. या रागातून त्याने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानात आग लावल्याचे चौकशीत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT