file photo
file photo 
नागपूर

एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अडकला...

सतीशकुमार डहाट

कामठी  (नागपूर) : नवीन कामठी पोलिसांनी छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून आणले व येथील दिवाणी न्यायालयात हजर केले. त्याला जामीन मिळाला; मात्र कळमना पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली.

सविस्तर असे की, गोकूल तुळशीराम हरडे (वय ४५) शीतलामाता मंदिराजवळ, न्यू येरखेडा, कामठी यांची ४ ऑगस्टच्या रात्री कळमना मार्गावरील बालाजी मंदिरासमोर ठेवलेली चारचाकी हायड्रॉइक सिमेंट मिक्सर मशीन (किंमत तीन लाख रुपये) चोरट्याने चोरून नेली असल्याचे ५ ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता निदर्शनास आले. नवीन कामठी पोलिस ठाण्याला तक्रार देण्यात आली होती. याची चौकशी करून राजनांदगाव येथील बिरुजू टोला (छत्तीसगड) येथे असल्याचे समजताच डीबी पथकासह छत्तीसगड येथे जाऊन ओरोपी भीमबली धनराज जांगडे (वय २९) रा. मिनीमता नगर, नागपूर याला अटक करण्यात आली. 

त्याच्याकडून चोरून नेलेली मिक्सर मशीन व लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (किंमत १ लाख ५० हजार रुपये) ताब्यात घेतला. हा ट्रॅक्टर कळमना पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले. कळमना पोलिसांना या ट्रॅक्टर चोरीचा छडा लावायचा होता. कामठी पोलिसांनी पकडलेला आरोपी हाच ट्रॅक्टर चोरीतील आरोपी असल्याचे कळमना पोलिसांना कळले. आरोपीला कामठीतील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. आरोपी न्यायालयाबाहेर येताच कळमना पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. पुढील तपास कलमना पोलिस स्टेशनचे डीबी पथकाचे किशोर देवांगण करीत आहेत.

(संपादन : मेघराज मेश्राम) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT