action against two hall for violating corona rules in wanadongri of nagpur 
नागपूर

लग्नात जास्त वऱ्हाडी बोलवणे भोवले, दोन मंगल कार्यालयावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

वानाडोंगरी (जि. नागपूर) : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या आदेशानुसार तहसील खांडरे यांनी परिसरातील दोन मंगल कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी परवानगीपेक्षा जास्त वऱ्हाडी विनामास्क आढळले. त्यामुळे दंड वसूल केला असून मंगल कार्यालय सील करण्याच्या कारवाईसाठी नोटीस बजावली.

दोन दिवसांपूर्वीच नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी यांनी हिंगणा तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन कारवाईसाठी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी(ता.१६)हिंगण्याचे तहसीलदार संतोष खांडरे यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार महादेव दराडे, वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी राजेश चुटे, तलाठी सतीश तिवारी व शिपायांना सोबत घेऊन वानाडोंगरी नगरपरिषद अंतर्गत महाजनवाडी परिसरातील बाबडे सभागृह व हिंगणा नगरपंचायत परिसरातील रेणुका सभागृह येथील आयोजित विवाह समारंभात शासनाने कोविड-१९ संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या दोन्ही सभागृहाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था नव्हती. परवानगीपेक्षा जास्त वऱ्हाडी होते. बहुतांश वऱ्हाडी विनामास्क आढळले, तसेच सोशल डिस्टसींगचे पालन करण्यात आले नव्हते. दोन्हीही मंगल कार्यालयाकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून कार्यालय सील करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव होणार नाही, याची प्रत्येक नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार संतोष खांडरे यांनी केले आहे. 

बाबडे व रेणुका सभागृहातील विवाह समारंभात परवानगीपेक्षा जास्त वऱ्हाडी होते. बहुतांश वऱ्हाडी विनामास्क आढळले. त्यामुळे कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दोन्ही सभागृहाकडून दंड वसुलीची कारवाई करण्यात आली. 
-संतोष खांडरे,  तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, हिंगणा 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT