action plan against school for extra fees in nagpur 
नागपूर

वसुलीबाज शाळांविरुद्ध 'अ‌ॅक्शन प्लॅन', आतापर्यंत फक्त पाच शाळांना वसुलीची नोटीस

मंगेश गोमासे

नागपूर : महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क नियमन ) कायदा २०११चे उल्लंघन करीत पालकांकडून मनमानी शुल्क वसुल करणाऱ्या पाच शाळांना आतपर्यंत शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. मात्र, आता त्यानंतर शाळांकडून कारवाई न केल्यास विभाग कोणती कारवाई करेल, याबाबत 'अ‌ॅक्शन प्लॅन' तयार करण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित १३ शाळांवरही कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. 

शिक्षण विभागाच्या निर्देशाचे पालन न करता अतिरिक्त शुल्क वसुली करणाऱ्या नारायणा आणि स्कूल ऑफ स्कॉलर, बेसा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जाफरनगर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूल, हजारी पहाड येथील सांदीपनी स्कूल व हिवरीनगर येथील सेंट झेव्हियर्स या सहा शाळांना पालकांकडून वसुल करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्क परत देण्याची नोटीस पाठविली आहे. त्याच्याकडून किमान २२ कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या नोटिशीनुसार अद्याप एकाही शाळेने पालकांचे शुल्क परत केलेले नाही. त्यामुळे यावर शिक्षण विभागाकडून नेमकी कोणती कारवाई करावी, याबाबत नागपूर शिक्षण विभागाने उपसंचालक, वर्धेचे डायट प्राचार्य आणि पालकांच्या समावेश असलेली समिती तयार करण्याचे निर्देश दिले आहे. समिती ३ दिवसात 'अ‌ॅक्शन प्लॅन' तयार करून त्यानुसार कारवाईस सुरुवात करणार आहे. गुरुवारी उपसंचालक कार्यालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठक घेऊन त्याबाबत निर्देश दिले. यासाठी विशेष वकिलाची नेमणूकही करण्यात येणार आहे. 

असा असेल अ‌ॅक्शन प्लॅन - 
समिती 'अ‌ॅक्शन प्लॅन'मध्ये कारवाई करताना कायदेशीर बाबींचा अभ्यास करेल. याशिवाय शाळांनी वर्षनिहाय घेतलेल्या शुल्काचा तपशिल तपासून त्यातून केलेल्या शुल्क वाढीबाबत माहिती एकत्र करेल. यावर संस्थेची संचालकांसमोर होणारी सुनावणी होत असताना, त्यांच्याविरुद्ध पुरावे देणे, न्यायालयासमोर कुठल्याही प्रकारे बाजू कमजोर होऊ नये याचाही अभ्यास करेल. 

माहिती घेण्यासाठी जाणार उपसंचालक - 
नागपुरातील १८ शाळांवर पालकांकडून शुल्क वसुलीची तक्रार करण्यात आली आहे. यापैकी ६ शाळांना वसुलीसाठी नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप १२ शाळांना कारवाईची नोटीस पाठविण्यात आलेली नाही. या शाळांकडून विभागाला माहिती देण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ही माहिती मिळविण्यासाठी खुद्द उपसंचालक या शाळांमध्ये जाणार आहे. ज्या शाळा माहिती देणार नाही. त्या शाळांविरुद्ध कारवाई करणार आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT