Pohara Water Crisis  sakal
नागपूर

Pohara Water Crisis : पोहरा गावात कृत्रिम पाणीटंचाई, प्रशासनाचे दुर्लक्ष

Pohara Water Crisis : कुही तालुक्यातील पोहरा गावात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

साळवा : पावसाळा सद्या आटोपून आता हिवाळ्याला सुरवात होत आहे. यंदा पावसाळ्यात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तरीही कुणी पाणीटंचाई निर्माण झाली, असे म्हणत असेल तर त्याला वेड्यातच काढले जाईल.

परंतु अशी परिस्थिती कुही तालुक्यातील पोहरा गावात निर्माण झाली. या गावात पाणीपुरवठ्यासाठी विहिरी, बोरींग, दोन पाण्याच्या टाक्या असूनही सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, याचे आश्चर्य आहे. कुही तालुक्यातील राजोला सर्कलमधील गट ग्रामपंचायत टेकेपार अंतर्गत पोहरा येथे दोन बोरिंग वेल, एक सिंथेटीक टॅंक असून नागरिकांना पाणी मिळत नाही.

पाणीपुरवठा करणारी मोटार गेल्या काही महिन्यांपासून जळाली आहे. एक बोरवेल बंद आहे. दुसऱ्या बोरवेलला पाणी नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शेतातून पाणी आणून पाण्याची समस्या सोडवावी लागते, असे येथील महिलांनी सांगितले. एक हजार मिटर अंतरावरुन पाणी आणताना फार त्रास होत असल्याचे सांगताना त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला.

पोहरा गावाची लोकसंख्या केवळ १४५ असून नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी टेकेपार ग्रामपंचायतचे उपसरपंच अज्ञान चोपकर यांना वारवार पाणीटंचाईची माहिती दिली.

परंतु त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले. ग्राम प्रशासनानही कुंभकर्णी झोपेत आहे. गावच्या लोकांच्या समस्यांशी जणू कोणाचेच देणेघेणे नाही. अशी येथील व्यवस्था आहे. पोहरा गावातील ग्रामस्थ बाबुराव कामडी, अमृत मुरुसकार, मेगराज कामडी, पिंकी कामडी, निकीता कामडी, रवीता वैद्य, शारदा चकोले, तन्नू वैद्य, ढोमण बारई यांनी या समस्येसाठी एकत्र येऊन आवाज उचलला आहे.

त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. पोहरा गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या येत्या चार दिवसात सुटली नाही तर आम्ही गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला आहे. टेकेपारच्या सरपंचाना या समस्येविषयी फोनवरुन विचारले असता त्यांनी वेळेवर कारागीर मिळत नाही त्यामुळे समस्या सोडवायला वेळ लागत असल्याचे सांगितले. मोटार दुरुस्ती झाल्यानंतर मी एक दोन दिवसात मोटार लावून देते, उत्तर दिले.

टेकेपार ग्रामपंचायतचे उपसरपंच अज्ञान चोपकर यांना वारवांर माहिती देऊनसुद्धा फक्त पोहरा गावी येतात व येऊन फक्त चकरा मारतात. मी आज पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती करुन देतो, कधी उद्या येतो, परवा येतो असे सांगून आम्हाला फक्त आश्वासने देतात. आम्हाला न्याय कोण देणार, पोहरा गाववासींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार?

-सचिन रामचंद्र वैद्य, अध्यक्ष, जि.प. शाळा समिती, पोहरा

गावात पाण्यासाठी दोन बोरिंग आहेत. त्यामध्ये एक खराब व एक सलाईनवर सुरु आहे व सिंटॅकची मोटार मागील काही दिवसापासून बंद असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतातून एक हजार मिटर अंतरावर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते.

-रविता रवींद्र वैद्य, अध्यक्ष, महिला बचत गट, पोहरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT