Admission process has been stoped due to lockdown 
नागपूर

मे महिना अर्धा सरला तरी शालेय प्रवेश प्रक्रीयेवर टाळेबंदीच! शाळा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर

मंगेश गोमासे

नागपूर  : राज्यात मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद झाल्याने सर्वच प्रशासकीय कामे बंद असून शाळांना त्याचा फटका बसतो आहे. मात्र, आता शाळा बंद असल्याने पाचवी आणि आठवीचे प्रवेश करायचे कसे असा प्रश्‍न राज्यातील 50 हजारावर माध्यमिक शाळा चालकांना पडला आहे. 

नागपुरात दोन हजारावर माध्यमिक शाळा असून राज्यात त्याची संख्या पन्नास हजारावर आहे. राज्यातील सर्वच शाळांना सध्या सुट्या आहेत. मात्र, निकाल तयार करणे, विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक भरणे, प्रमोशन रजिस्टर भरणे, वर्ग 4 व 7  च्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्याचे दाखले (टीसी) तयार करणे, दाखल खारीज रजिस्टर व (टीसी) निर्गमन रजिस्टरमध्ये नोंदी घेणे, दाखल पात्र मुले शोधून त्यांच्या घरी भेटी देणे, वर्ग 1, 5 व 8 मध्ये प्रवेश प्रक्रिया राबविणे, पुस्तकपेढी, वाचनालय रजिस्टर अद्ययावत करणे, शाळेचे स्टॉकबुक अद्ययावत करणे आदी अनेक कामे शाळांमध्ये करावी लागतात. 21 मार्चपासून टाळेबंदी घोषित झाल्यापासून शाळांमध्ये शिक्षकांना जाता आलेले नाही. या प्रकाराने विद्यार्थी व पालकांचा शाळेशी असलेला संपर्क खंडित झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे शिक्षकांनी विद्यार्थी प्रवेशासाठी परीसरामध्ये जाऊन पालकांशी संपर्क करण्यास प्रशासनातर्फे बंदी आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील सर्व शाळांची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पटसंख्येअभावी मोठ्या संख्येत शिक्षक अतिरिक्त होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या असून विदर्भातील शाळांच्या उन्हाळी सुट्या आता सुरू झालेल्या आहेत. या परिस्थितीत पाचवीतून सहावीत आणि आठवीतून नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांमुळे पाचवीतील रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी शिक्षकांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. मात्र, सगळेच बंद असल्याने प्रवेश करणार केव्हा असा प्रश्‍न प्रत्येकच शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पडला आहे. 

प्रवेशासाठी तरी मुभा द्या 

राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे राज्यातील सर्वच शाळा 16 मार्चपासून बंद आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासकीय कार्यालयांच्या धर्तीवर दोन किंवा तीन कर्मचारी उपस्थितीचे बंधन घालून सकाळी तीन तास शाळेचे कार्यालय फक्त विद्यार्थी प्रवेशासाठी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम पंचभाई यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT