Nagpur : आजपासून ‘स्कूल चले हम’  sakal news
नागपूर

Nagpur : आजपासून ‘स्कूल चले हम’

ग्रामीणमध्ये ५ ते १२, शहरातील ८ ते १२ चे वर्गाचा समावेश

अक्षय साबळे

नागपूर : जिल्‍ह्यात तब्बल सात महिन्यानंतर उद्या सोमवारपासून (ता.४) शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर स्थानिक जिल्हा व शहर प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी आदेश काढले. त्यामुळे शाळांनी कोरोना नियमाचे पालन करीत, शाळा सुरू करण्यास संमती दर्शवीत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. त्यानुसार ग्रामीणमध्ये ५ ते १२, शहरात ८ ते १२ चे वर्ग सुरू होणार आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा शाळा बंद करीत, ऑनलाइन शिक्षण देण्यात सुरुवात झाली. आता कोरोना रुग्णात कमालीची घट झाल्याने नियम आणि अटींचे पालन करीत, पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वीचे वर्ग तर शहरी भागात ८ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ज्या पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी हे मेडिकल चौकातील पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. तसेच काही शाळा मुलांचे स्वागत फुलांनी करण्याची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले.

शाळा व पालकांनी हे करावे

  • शाळेत विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे

  • हेल्थ केअर क्लिनिक सुरू करणे

  • सॅनेटायझर आणि मास्क नसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा पुरवठा करणे

  • सॅनिटायझरने हात धुण्यास शिक्षकांनी वारंवार सूचना द्याव्यात.

  • एका वर्गात किमान १५ ते २० विद्यार्थी बसविणे.

  • आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टरकडे नेण्याची सोय करणे

  • शाळेत दर्शनी भागावर मास्कचा वापर करण्याच्या सूचना देणारे पोस्टर लावावे.

  • विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पालकांनी मास्क व सॅनेटायझर देणे

  • मित्रांसोबत अंतर ठेवण्याचा सल्ला देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT