After the death of her husband, the wife rushed to the High Court for compensation 
नागपूर

मोकाट जनावरांमुळे गेला पतीचा जीव; पत्नीचा दहा लाखांचा नुकसानभरपाईचा दावा!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पतीचे निधन रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे झाले असून, त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करीत मृताच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. सिमरन रामलखानी असे याचिकाकर्त्या पत्नीचे नाव आहे. दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची विनंती त्यांनी याचिकेतून केली आहे. 

याचिकाकर्त्यानुसार, त्यांचे पती रामकुमार यांचे 20 जुलै 2018 रोजी अपघाती निधन झाले. दुचाकीने गिट्टीखदान येथून जात असताना रस्त्यावर अचानक मोकाट जनावर गाडीसमोर आले. त्यांची गाडी जनावराला धडकली. रामकुमार रस्त्यावर आदळल्याने डोक्‍याला जबर दुखापत झाली. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता मृत्यू झाला. 

रामकुमार यांचे जरीपटका येथे किराणा दुकान होते. त्यांच्या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांचा मुलगा व मुलगी लहान असल्याने कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार, मोकाट जनावरामुळे अपघात झाल्यास स्थानिक प्राधिकरणाला भरपाई देणे बंधनकारक आहे. तेव्हा याचिकाकर्त्यांनी महापालिका व वाहतूक पोलिसांकडे निवेदन सादर केले होते. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

उच्च न्यायालयाने राज्य सरकार, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या

रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांची नोंद घेत उच्च न्यायालयानेच महापालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरातील अशा मोकाट जनावरांना पकडण्याचे व त्या जनावराच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचेही पालन झाले नाही. तेव्हा रामकुमार यांच्या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याने दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ' प्रशासक नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर आज सुनावणी

Shivam Associates Scam : 'शिवम'मध्ये महाराष्ट्रातील 10 हजार लोकांचे पैसे बुडाले? 'सीआयडी'च्या रडारवर सनी लिओनी, 2400 कोटींचा घोटाळा नेमका काय आहे?

Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई

T20 Mumbai League: सूर्यकुमार यादवचे अम्पायरसोबत भांडण; वानखेडे स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा, संघ हरला अन्...

SCROLL FOR NEXT