नागपूर

दिलासादायक चित्र : दोन महिन्यांनंतर कोरोनाबाधितांची टक्केवारी घसरली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन महिन्यांपासून बाधितांच्या वाढत्या संख्येने नागपूरकरांच्या जिवाला घोर लागला होता. दोन महिन्यांनी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या टक्केवारीचा आलेख खाली (corona patient) आल्याने दिलासादायक चित्र आहे. मागील ३० एप्रिल ते ६ मे या आठवड्यात बाधितांची टक्केवारी १८.०६ असून ५ ते ११ मार्च या आठवड्यातही हीच टक्केवारी होती. (After two months the percentage of coronaviruses dropped)

दोन महिन्यांत नागरिकांनी कोरोनाचे रौद्ररूप अनुभवले. बाधितांना बेड, ऑक्सिजन, औषधही मिळेनासे झाले होते. अनेक कुटुंब कोरोनाच्या कवेत आले. अनेकांनी कोरोनाशी मुकाबला करत त्यावर मात केली. पण कोरोनाने खऱ्या अर्थाने १२ मार्चपासून उग्ररूप धारण केल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. ५ ते ११ मार्च या आठवड्यात ४८ हजार १६१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील ८ हजार ७०० जण बाधित आढळून आले होते. बाधितांची ही टक्केवारी १८.०६ अशी होती. त्यानंतर मात्र प्रत्येक आठवड्यात बाधितांच्या टक्केवारीचा आलेख वाढतच गेला.

१६ ते २२ एप्रिल या आठवड्यात तर सर्वाधिक ३१.२५ बाधितांची टक्केवारी होती. त्यानंतरच्या २३ ते २९ एप्रिल या आठवड्यात बाधितांची टक्केवारी २४.३१ पर्यंत खाली आली. मागील ३० एप्रिल ते ६ मे या आठवड्यात ही टक्केवारी १८.०६ पर्यंत खाली आली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली. त्यामुळे आशादायक चित्र असून योग्य सावधगिरी बाळगल्यास कोरोनावर नियंत्रण शक्य असल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

नागरिकांची सतर्कता

गेल्या सात आठवड्यात कोरोनाच्या कहरामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली होती. यातूनच कोरोना होऊ नये यासाठी नागरिकांनी घरातून कमीत कमी वेळेस बाहेर पडणे, मास्कचा वापर, गर्दीचे ठिकाण टाळणे, अशा उपाययोजनांवर भर दिला. त्यामुळे मागील आठवड्यापासून चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी झाल्याचे समजते.

आठवडनिहाय चाचण्या व बाधित

आठवडा चाचण्या बाधित टक्केवारी

५ ते ११ मार्च ४८,१६१ ८,७०० १८.०६

१२ ते १८ मार्च ६४,९०३ १५,६७५ २४.१५

१९ ते २५ मार्च ७५,१९९ १८,९३३ २५.१८

२६ मार्च ते १ एप्रिल ६८,२५२ १५,६८३ २२.९७

२ ते ८ एप्रिल ७३,२५३ २०,७३२ २८.३०

९ ते १५ एप्रिल ९७,०५७ २७,५२३ २८.३६

१६ ते २२ एप्रिल १,०४,४६० ३२,६४६ ३१.२५

२३ ते २९ एप्रिल १,२३,४३४ ३०,००३ २४.३१

३० एप्रिल ते ६ मे १,१०,६०२ १९,९७७ १८.०६

(After two months the percentage of coronaviruses dropped)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT