doctor 
नागपूर

रुग्ण हजार आणि मनुष्यबळ केवळ पंचावन्न! बहोत नाइन्साफी! मेयोच्या मनुष्यबळाच्या मागणीला अखेर यश

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने आरोग्य विभागाची खूप धावपळ उडाली. उपलब्ध मनुष्यबळातच रुग्णांवर उपचार करणे भाग होते. त्याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर आला आणि शेवटी मेयोतील यंत्रणेच्या सहनशक्तीचा बांध फुटला.

नागपुरात पहिला कोरोनाचा रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाला. योग्य उपचारातून तो बरा झाला. यानंतर शासनाकडून मेयोवर कोरोना रुग्णांचा भार देण्यात आला. परंतु मनुष्यबळ मात्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे अवघ्या ५५ जणांच्या मनुष्यबळात हजारो कोरोनाबाधितांवरील उपचाराचा डोलारा सांभाळला जात होता.

अखेर मेयोत विद्यार्थ्यानी विद्रोह केल्यानंतर मेयो प्रशासनाने डॉक्टर मिळतील का डॉक्टर अशा मागणीचा नारा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केला. मेयो आणि मेडिकलमधील मनुष्यबळात मोठी तफावत असल्याने ६०० खाटांचा भार पेलवणे कठिण असल्याने काम बंदचा इशारा देण्यात आला होता. अखेर एम्स आणि सार्वजनिक आरोग्य विभागातून मेयोला मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला. मेयोने हे मनुष्यबळ आयात केल्यानेच आता काहीसा कोरोनाच्या उपचाराचा गाडा रुळावर येतो आहे.

मेयो आणि मेडिकलच्या दोन्ही कोविड हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ६०० खाटा आहेत. तर मेयोपेक्षा दुप्पट मनुष्यबळ मेडिकलमध्ये आहे. तेथे १०३ जणांचा मुबलक मनुष्यबळाचा साठा असूनही ६०० खाटाच तयार करण्यात आल्या. असे असतानाही कोविड रुग्णांना थेट मेयोत रेफर करण्याचे धोरण मेडिकल प्रशासनाकडून राबविण्यात येत असल्यामुळे मेयोतील राबराब राबणारे डॉक्टर, परिचारका, तंत्रज्ञांनी आवाज बुलंद केला.

सविस्तर वाचा - खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले
रात्री उशीरापर्यंत मेयोची कॉलेज कौन्सिल सुरू होती. यात मनुष्यबळ मिळाले तरच काम करू अन्यथा काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला. याची दखल तत्काळ वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली. परिचारिका, डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माता, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर तसेच मेडिसीन विभागासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. एम्सचे मेडिसीन विभागप्रमुख डॉ. पी. पी. जोशी, डॉ. कुंभलकर मेयोत कोविडसाठी प्रतिनियुक्तीवर रुजू झाले आहेत.

मेयोला मिळालेले मनुष्यबळ

  • वरिष्ठ डॉक्टर : २
  • परिचारिका : २८
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर : २
  • प्रयोगशाळा सहाय्यक : १
  • औषध निर्माता : २
  • कम्युनिटी हेल्थ ऑफिसर  :१
  •  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT