mangesh kadav 
नागपूर

मंगेशच्या मागे लागली गुन्ह्यांची साडेसाती...वाचा तर कसे..

अनिल कांबळे

नागपूरः शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावर असताना ठगबाज व खंडणीबहाद्दर मंगेश कडव यांने अनेक लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. त्याचे अन्य काही फसवणुकीचे आणखी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे कडव याच्याविरुद्ध आणखी दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे.
गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आतापर्यंत कडव प्रकरणात 40 जणांचे बयाण नोंदविले आहेत. आणखी 20 जणांचे बयाण नोंदविण्यात येणार आहे. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान गुन्हेशाखा पोलिसांनी मोठ्‌या प्रमाणात भूखंडाचे करारनामे, कोरे धनादेश व संपत्तीशी संबंधित दस्तऐवज जप्त केले.

या दस्तऐवजाच्या तपासणीदरम्यान कडव याने अंबाझरीतील वर्मा ले-आऊट व बजाजनगरमधील प्रत्येकी 50 लाख रुपये किमतीचे घर हडपल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अंबाझरी व बजाजनगरमध्ये गुन्हे दाखल होणार आहेत. कडव हा गुन्हेशाखा पोलिसांच्या कोठडीत असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत खंडणी व फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत.


संपादन-अनिल यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT