भिवापूर : मिरची कटाई केंद्रावर काम करणाऱ्या मजुरांच्या समस्या समजावून घेताना कृषिमंत्री भुसे व आमदार पारवे.  
नागपूर

कृषिमंत्री भुसेंनीही अनुभवला "भिवापुरी मिरची' चा ठसका, कसा काय,...

सकाळ वृत्तसेवा

भिवापूर (जि.नागपूर) : या भागातील हजारो मजुर कुटुंबांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या येथील मिरची कटाई केंद्रांना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शनिवारी अचानक भेट दिली. आमदार राजू पारवे त्यांच्यासोबत होते. कटाई केंद्रांवर काम करणाऱ्या मजुरांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी जाणून घेतल्या.

अधिक वाचा : सीमा तपासणी नाक्‍यावर दिवसाला 10 लाख कमाई, अधिकारी मालामाल, काय आहे प्रकरण...

रोजगाराची समस्या मिटली, पण अडचणी कायम
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी मिरची केंद्रे सुरू असून त्यावर हजारो मजुरांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गत काही वर्षात या केंद्रांची व्याप्ती वाढली आहे. नागपूरसह लगतच्या चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कटाई केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या भागातील रोजगाराचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. मिरची कटाई केंद्र चालकांनी रोजगार उपलब्ध करून देत रोजगाराची समस्या दूर केलेली असली तरी, या केंद्रांवर काम करणाऱ्या मजुरांना भेडसावणाऱ्या अन्य समस्या दूर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी त्यांना आरोग्यविषयक सेवा व विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी आमदार पारवे यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.

अधिक वाचा : बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश

खर्च अधिक उत्पादन कमी
येथील भिवापुरी मिरची जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, "खर्च अधिक व उत्पादन क्षमता कमी ' यामुळे शेतकऱ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. या मिरचीची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून भिवापुरी मिरचीवर संशोधनाची गरज असल्याचे पारवे यांनी कृषिमंत्री भुसे यांना पटवून देत सोबतच मिरचीवर प्रक्रिया करणारे एखाद मोठे उद्योग स्थापन करण्याची आवश्‍यकता विषद केली.

मोठी बातमीः निरोगी व्यक्‍तीवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रूग्णालयात सुविधा...

शेतकऱ्याचा बांधावरच केला सत्कार
या दौऱ्यात कृषिमंत्री भुसे यांनी तास ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या मोखाळा येथील प्रगत भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रवीण वंजारी यांच्या शेतावर भेट देत, शेताच्या बांधावरच शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. बेसुर येथील डॉ. नारायण लांबट या शेतकऱ्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन काठावरील जमीन खरडून निघाली होती. या नुकसानाचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. भिवापूर तालुक्‍याचे24 तर उमरेड तालुक्‍याचे1 कोटी रुपये शासनाकडून घेणे आहेत. ही रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यासह गट शेती प्रोसेसिंग प्रोजेक्‍टचे शासनाकडे थकीत असलेले अर्धे अनुदान तातडीने देण्याची मागणीही पारवे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT