Love Marriage  Esakal
नागपूर

Ahmednagar: पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना! जात पंचायत भरवत प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला मारहाण,६ जणांविरुद्ध गुन्हा

पाथर्डी तालुक्यातील मढी येथे एका समाजाने जातपंचायत भरवली. यात न्यायनिवाडा करताना प्रेमविवाह केलेल्या मुलीला पंचांनीच मारहाण केली. ही घटना एक मार्च २०२४ रोजी घडली.

Manoj Bhalerao, सकाळ डिजिटल टीम

Girl Beaten in Jaat Panchayat: पाथर्डी तालुक्यातील मढी येथे एका समाजाने जातपंचायत भरवली. यात न्यायनिवाडा करताना प्रेमविवाह केलेल्या मुलीला पंचांनीच मारहाण केली. ही घटना एक मार्च २०२४ रोजी घडली. याप्रकरणी बुधवारी (३ मार्च) मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

चंदर बापू दासरजोगी, लक्ष्मण चंदर दासरजोगी, तात्या चंदर दासरजोगी, ताया मल्लू दासरजोगी, रोहित ताया दासरजोगी, काशीनाथ अंबादास दासरजोगी (रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर)​ अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी युवतीने प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहावर निवाडा करण्यासाठी मढी येथे जातपंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फिर्यादी मुलीचे वडील, आई आणि भाऊ उपस्थित होते. पंच म्हणून वरील आरोपी उपस्थित होते.

तुमच्या मुलीने केलेला प्रेमविवाह आपल्या समाजाला मान्य नाही. तुम्ही तो मोडून काढा. आपण मुलीचा दुसरा विवाह लावून देऊ, पंचांनी मुलीच्या आई, वडिलांना सांगितले. ‘मुलीने जो प्रेम विवाह ​केला आहे, तो मुलगा चांगला आहे, त्यामुळे दुसरीकडे लग्न कशाला करायचे,​ असे पंचांना सांगितले. त्यानंतर ​पंचांनी मुलीच्या वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केले. पीडित मुलगी, तिची आई यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण के​ली. ‘जर तुम्ही आमचे सांगितलेले ऐकले नाही, तर एका एकालाही जिवंत ठेवणार नाही, अशी ​धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT