Shirdi Loksabha Esakal
नागपूर

Shirdi Loksabha: शिर्डीच्या जागेवर भाजपचा दावा! शिंदे गटाचे खासदार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आज भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.

सकाळ डिजिटल टीम

Shirdi Loksabha Constituency: भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर सोपविली आहे. जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असताना आज भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपला द्यावी, अशी मागणी केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईकडे रवाना झाले.

गेल्या काही दिवसांत विखे पाटलांनी लागोपाठ दोन वेळा दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत अहमदनगर लोकसभा जागेबरोबरच त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची देखील चर्चा झाली की काय, याबाबत तर्क लढवले जात आहेत.

त्यापाठोपाठ आज मूळ भाजपचे असलेले माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि विखे समर्थक माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, या तीन महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकर परिषद घेतली. या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत भाजपची ताकद आहे. विविध सर्वेक्षणांच्या माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. भाजपकडे उमेदवार देखील आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी केली. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Latest Marathi news )

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे लोखंडे यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र शिवसेनेला किती जागा मिळणार, याबाबत निश्चित माहिती नसल्याने या गटातील खासदारांत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी लोखंडे तातडीने मुंबईकडे रवाना झाले. पाठोपाठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवर दावा सांगितला.

सर्वेक्षण ठरविणार जागा कुणाची ?

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव ही भाजपची जमेची बाजू आहे. तथापि, अद्याप भाजपकडून अन्य संभाव्य उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. शिंदे गटातील उमेदवारांना गरज असेल तेथे कमळ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची मुभा यापूर्वी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. (Latest Marathi news )

हा पर्याय लोखंडे यांना खुला असू शकतो. मात्र सर्वेक्षणात काय चित्र समोर येईल, यावरून ही जागा कुणाकडे जाईल, हे ठरेल असा दावा भाजपचे पदाधिकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT