Rishabh Pant Fitness IPL 2024 : याच चिठ्ठीची होती प्रतिक्षा... अखेर ऋषभ पंतला मिळाली गूड न्यूज

Rishabh Pant Fitness IPL 2024 : ऋषभ पंत दिल्लीच्या स्क्वाडमध्ये नव्हता. त्यामुळे तो आयपीएल खेळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र पंतची प्रतिक्षा संपली.
Rishabh Pant
Rishabh Pant esakal

Rishabh Pant Fitness IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला आयपीएल 2024 खेळण्याची परवानी मिळाली आहे. त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळालं आहे.

यापूर्वी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या स्क्वॉडमध्ये ठेवलं नसल्याचं वृत्त समोर आलं होत. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला एनसीएकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळालं नव्हतं. दिल्ली कॅपिटल्सने एनसीएकडून पंतच्या फिटेनसचं सर्टिफिकेट मागितलं होतं. मात्र बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतच उत्तर मिळालं नव्हतं.

Rishabh Pant
WTC Point Table : पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया होणार फायनल? कांगारूंनी न्यूझीलंडविरूद्धची मालिका 2-0 ने जिंकतात बदललं समीकरण

मात्र आज तकने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतला फिटनेस सर्टिफिकेट मिळालं आहे. तो दिल्लीकडून कर्णधारपदही भुषवताना दिसणार आहे. आयपीएलची सुरूवात 22 मार्चपासून होणार आहे.

पंत सध्या आयपीएल 2024 संदर्भातील काही जाहिरातींचे शूटिंग करण्यात व्यग्र आहे. तो काही दिवसातच दिल्लीत येऊ शकतो. दिल्लीचा संघ आयपीएल हंगामातील आपल्या सुरूवातीचे काही सामने विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. आता पंत देखील संघासोबत वाझॅकमध्ये दिसेल.

Rishabh Pant
ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार... ICC मिटिंगसाठी पीसीबी करतय प्लॅनिंग?

पंत दिल्ली संघाचे नेतृत्व करताना दिसणार का?

IPL मध्ये ऋषभ पंत कोणत्या भूमिकेत दिसणार? तो संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसेल की खेळाडू म्हणून खेळताना दिसेल? या प्रश्नांबाबत आज तकने दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.

मात्र दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. पण दिल्ली फ्रँचायझी ऋषभ पंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लक्षात घेऊन त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. पंत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता दिसत नाही. तो सुरूवातीला फक्त फलंदाज म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com