Shirdi Loksabha  Esakal
नागपूर

Shirdi Loksabha: शिर्डीची जागा ठाकरे गटाकडेच! महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, संजय राऊत यांनी दिली माहिती

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Shirdi Loksabha Constituency: शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे. आम्ही येथे प्रचारास सुरुवात देखील केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबतच राहतील. त्यांनी ज्या जागा मागीतल्या आहेत, त्यावर त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील. ही बाब वगळता महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले. त्यावर आता चर्चा होणार नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आज त्यांनी लोणी येथे जाऊन घोगरे परिवाराचे सांत्वन केले. या भेटीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सुहास वहाडणे, सचिन कोते, संजय शिंदे, राजेंद्र पठारे, भरत मोरे व नानासाहेब बावके आदी पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

ते म्हणाले की, बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्यास खासदार शरद पवार उपस्थित राहिले, यात वावगे काही नाही. मात्र भाजपने जेथे रोजगार आहे, तेथे हा मेळावा आयोजित केला. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करणार आहोत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT