Air Travel  sakal
नागपूर

Air Travel : विमान प्रवास मंदावला! प्रवासी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली; तिकीटही स्वस्त

विमान प्रवासी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - संततधार पावसामुळे विमान प्रवास चांगलाच मंदावला आहे. विमान प्रवासी संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी झालेली आहे. ही घट दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत भरून निघण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात गो फर्स्ट एअरलाईनने विमान उड्डाण बंद केल्याने विमानाच्या तिकिटात विक्रमी वाढ झाली होती. त्याचा फटका पर्यटकांना बसला होता. आता प्रवासी कमी झाल्याने भाडे कपातही करण्यात आलेली आहे.

उन्हाळ्यात शालेय सुट्ट्यांमुळे विमान कंपन्यांचे बुकिंग ९० टक्के राहत होते. इंदूर, हैदराबाद या मार्गांवर केवळ एकाच विमान असल्याने कंपन्याही मनमानी भाडे आकारत होत्या. आता उन्हाळ्याच्या सुट्या संपल्याने भाडे कपात केली आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी मुंबई, दिल्लीसह अन्य ठिकाणांसाठी १० ते १५ हजार रुपये भाडे आकारले जात होते. आता ते चार ते साडेपाच हजारांवर आले आहे.

दररोज ३४ उड्डाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकूण ३४ उड्डाणे होत आहेत. तेवढीच विमाने उतरतही आहेत. एकूण ६४ विमाने ये-जा करीत आहेत. सर्वाधिक उड्डाणे मुंबईहून होत आहेत. त्यात दररोज सात आणि एक विमान आठवड्यातून दोन दिवस आहे. त्याचप्रमाणे दिल्लीला जाणाऱ्या विमानांची संख्याही वाढून पाच झालेली आहे.

पुण्याकरिता पाच, बेंगळुरूसाठी तीन, हैदराबाद, कोलकाता, इंदूर लखनौ, गोवा, नाशिक, चेन्नईसाठी प्रत्येकी एक विमान आहे. अहमदाबाद दोन, बेळगाव (स्टार एअर) दोन, आंतरराष्ट्रीय विमानामध्ये शारजाला जाणारे एक आणि दोहाला एक विमान उड्डाण करते.

दिवाळीत वाढणार प्रवासी

विद्यार्थ्यांच्या सुट्या संपल्या असून प्रवासी संख्या आता कमी झालेली आहे. ही घट दिवाळीतील सुट्यांमध्येच भरून निघणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा विमान कंपन्यांकडून विमान भाडे वाढवले जाणार आहे. नागपूर शहरातील अनेक विद्यार्थी व नोकरदार दिवाळीत घरी येतात. त्यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद येथील तिकिटांचे दरही गगनाला भिडणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलीस कुठं आहेत? अंडर 21 मुलांचा पबमध्ये दारू पिऊन धिंगाणा; पुण्यात फ्रेशर पार्टींचा बेकायदा बाजार

Bajaj Allianz: 15,200 रुग्णालयांचा बजाज अ‍ॅलिअन्झला दणका; कॅशलेस सेवा केली बंद, काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025: आपल्या आवडत्या मोदकासाठी बाप्पाने घातली होती आईवडिलांनाच पृथ्वीप्रदक्षिणा! वाचा ही रंजक कथा

'इन्स्पेक्टर झेंडे'चा ट्रेलर पाहिलात का? मनोज बाजपेयीसोबत भाऊ कदमचा दमदार अभिनय, चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित सिनेमा सत्य घटनेवर आधारित

Satara News: संवर्ग दोनमधील शिक्षकांवर कारवाई कधी?; बदल्‍यांमध्ये बनवेगिरी केल्याचे स्पष्ट; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

SCROLL FOR NEXT